गुन्हेगारी, भ्रष्टाचाराविरुद्ध मेक्सिकोतील तरुणाई रस्त्यावर 
आंतरराष्ट्रीय

गुन्हेगारी, भ्रष्टाचाराविरुद्ध मेक्सिकोतील तरुणाई रस्त्यावर

बांगलादेश आणि नेपाळपाठोपाठ आता अमेरिकेचा शेजारी देश असलेल्या मेक्सिकोमध्ये तरुणाई (जेन-झी आंदोलन) रस्त्यावर उतरली आहे. वाढती गुन्हेगारी, बोकाळलेला भ्रष्टाचार आणि सरकारविरुद्धच्या असंतोषाविरुद्ध तरुणाईच्या संतापाचा उद्रेक झाला. तरुणांचे आंदोलन पाहून विरोधी पक्षांचे नेते आणि वृद्धही आता आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Swapnil S

मेक्सिको सिटी : बांगलादेश आणि नेपाळपाठोपाठ आता अमेरिकेचा शेजारी देश असलेल्या मेक्सिकोमध्ये तरुणाई (जेन-झी आंदोलन) रस्त्यावर उतरली आहे. वाढती गुन्हेगारी, बोकाळलेला भ्रष्टाचार आणि सरकारविरुद्धच्या असंतोषाविरुद्ध तरुणाईच्या संतापाचा उद्रेक झाला. तरुणांचे आंदोलन पाहून विरोधी पक्षांचे नेते आणि वृद्धही आता आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक झडप झाली.

‘जनरेशन झेड’च्या तरुणांनी केलेल्या निदर्शनांना विरोधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. मात्र, निदर्शनाचे हिंसाचारात रूपांतर झाले. हिंसाचारात अनेक जण जखमी झाले असून मोठ्या प्रमाणावर अटकसत्र करण्यात आले आहे. शनिवारी झालेल्या मोर्चात एकूण १०० पोलीस जखमी झाले आहेत. त्यापैकी ४० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर चार जणांना मानसिक धक्का बसला आहे. जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत. या संघर्षात २० नागरिक जखमी झाले आहेत.

शनिवारी मेक्सिको सिटीच्या रस्त्यावर अचानक हजारो लोक जमले. हातात फलक, चेहऱ्यावर संताप आणि वेगवेगळ्या घोषणा देत त्यांनी आंदोलन सुरू केले. जेन-झी तरुण (१९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेली मुले) या आंदोलनाच्या केंद्रस्थानी होते. आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर आंदोलक आणखी आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले.

किचन बजेट बिघडणार! घरगुती गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महागला; नवे दर आजपासून लागू

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; वाचा संपूर्ण वेळापत्रक

अटल सेतू परिसरात तिसरी, तर पालघरमध्ये चौथी मुंबई वसवणार; मुंबईसह पुणे आणि नागपूरमध्ये मेट्रो विस्तारणार- मुख्यमंत्री

महाबळेश्वरमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; वन विभागाने केली सात जणांना अटक

Ajit Pawar Plane Crash Case: चौकशीच्या नावाखाली सिंह यांना VIP पाहुणचार; रोहित पवार यांचा आरोप