Microsoft Global Outage: मायक्रोसॉफ्टची सेवा पूर्ववत 
आंतरराष्ट्रीय

Microsoft Global Outage: मायक्रोसॉफ्टची सेवा पूर्ववत

अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनी 'मायक्रोसॉफ्ट'ने आपल्या सर्व सेवा पूर्ववत केल्या आहेत. यामुळे 'आऊटलुक', 'टीम्स' आणि इतर 'मायक्रोसॉफ्ट ३६५' अॅप्लिकेशन्सवर जगभरात झालेला मोठा गोंधळ आता संपुष्टात आला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली अमेरिकेची : अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनी 'मायक्रोसॉफ्ट'ने आपल्या सर्व सेवा पूर्ववत केल्या आहेत. यामुळे 'आऊटलुक', 'टीम्स' आणि इतर 'मायक्रोसॉफ्ट ३६५' अॅप्लिकेशन्सवर जगभरात झालेला मोठा गोंधळ आता संपुष्टात आला आहे. गेल्या चोवीस तासांहून अधिक काळ व्यावसायिक आणि ग्राहकांना या जागतिक बिघाडामुळे मोठा त्रास सहन करावा लागला होता.

कंपनीने आपल्या सर्व्हिस स्टेटस पेजवर अपडेट जाहीर केले आहेत. त्यानुसार 'सर्व सेवा आता पूर्ववत सुरू' आहेत. गुरुवारपासून विविध देशांमधील युजर्सना ईमेल, व्हर्चुअल मीटिंग्ज आणि क्लाउड आधारित वर्कप्लेस टूल्स वापरताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. कंपनीच्या माहितीनुसार, नेटवर्क क्षमता वाढीदरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उद्भवली होती. हा बिघाड कोणत्याही सायबर हल्ल्यामुळे किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीमुळे झाला नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कंपनीची दिलगिरी व्यक्त

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, या बिघाडामुळे आमच्या ग्राहकांना आणि भागीदारांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. ग्राहकांचा विश्वास आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही कंपनीने नमूद केले. या समस्येचा प्रामुख्याने 'एक्सचेंज ऑनलाईन' या क्लाउड ईमेल प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक परिणाम झाला,

कंपनीने सुरुवातीला अनेक क्षेत्रांमधील पायाभूत सुविधांवरील वाढलेला ताण यामागे असल्याचे सांगितले होते, मात्र नंतर काही सव्र्व्हर अनपेक्षितपणे बंद पडल्यामुळे उर्वरित यंत्रणेवरील ताण वाढल्याचे स्पष्ट झाले. तथापि ही समस्या युजर्सच्या अतिवापरामुळे उद्भवलेली नाही, असे कंपनीने नंतर स्पष्ट केले.

दरम्यान, काही पूर्ववत झालेले सर्व्हर चालू असताना त्यांच्याकडे ट्रॅफिक वळवल्यामुळे ते पुन्हा प्रतिसाद देत नव्हते, ज्यामुळे सेवा पुनर्स्थापनेच्या कामात काही अडथळे आले. त्यानंतर इंजिनियर्सने ट्रॅफिक मॅनेजमेंट प्रक्रियेत सुधारणा केली आणि यंत्रणेची स्थिरता तपासत टप्प्याटप्प्याने क्षमता पूर्ववत केली. याशिवाय, गुरुवारी काही विमान कंपन्यांच्या ईमेल सपोर्ट चॅनेलवरही परिणाम झाल्याचे समोर आले, जरी पर्यायी ग्राहक सेवा चॅनेल कार्यरत होते.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IND vs NZ 5th ODI: भारताच्या फलंदाजांचा कस; न्यूझीलंडविरुद्ध आज निर्णायक पाचवा एकदिवसीय सामना

१४ कोटी मतदार अवैध, मग निवडणुका कशा वैध? राहुल गांधी यांचा सवाल

नवा शैक्षणिक वादंग; खासगी विद्यापीठे, स्वायत्त महाविद्यालये शुल्क नियामक प्राधिकरणाच्या कक्षेत? विरोधकांचा आक्षेप, सत्ताधारीही अस्वस्थ

Ind vs Pak U19 Final: आशियावर भारताचेच वर्चस्व; थरारक लढतीत पाकिस्तानवर १ गडी राखून सरशी, मोहित ठरला नायक

आजचे राशिभविष्य, १५ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत