आंतरराष्ट्रीय

भारतीय वंशाचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार निकोलस सिंगला कॅनडात अटक

पॅरोलच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल निकोलसविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.

Swapnil S

टोराण्टो : कॅनडाच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत असलेल्या एका भारतीय वंशाच्या गुन्हेगाराला अखेर टोरोंटो पोलिसांनी अटक केली. निकोलस सिंग असे या गुन्हेगाराचे नाव असून, गेल्या १८ महिन्यांपासून तो फरार होता. पॅरोलच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल निकोलसविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.

खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती रविवारी कॅनडाच्या पोलिसांनी दिली. काही दिवसांपूर्वी कॅनडा सरकारने भारतातील लॉरेन्स बिश्नोई टोळीलाही दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. कॅनडा सरकारने त्याला ‘मोस्ट वॉन्टेड’ म्हणून घोषित केले होते.

कॅनडियन पोलिसांनी २०२३ मध्ये निकोलस सिंगला चोरी आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला पाच वर्षे पाच महिने आणि दहा दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी टोरोंटो येथील तुरुंगात शिक्षा भोगत असताना निकोलस फरार झाला होता. ऑगस्ट २०२४ पासून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. निकोलसच्या अटकेसाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या तुकड्यांची नेमणूक करण्यात आली होती.

कचरा टाकणाऱ्यांना ‘एआय’ कॅमेऱ्याची तंबी; मुंबई मनपाचा उपक्रम, कचरा इतरत्र टाकताच स्वच्छतेचा संदेश मिळणार

Pune : "मॅडम, तुम्ही ड्रिंक केलीये का? नाही...मी दारू पिलीये"; मद्यधुंद महिला पोलिसाची उलट्या दिशेने ड्रायव्हिंग, Video व्हायरल होताच निलंबन

आरटीओंना नोटीस; HSRP बसविण्यात दिरंगाई भोवणार

डिजिटल फसवणूक; पीडितांना पूर्ण भरपाई - सुप्रीम कोर्ट

‘इंडिया’ आघाडीच्या मार्चला CJP चा पाठिंबा; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे राहुल गांधींचे आ‌वाहन