नेपाळमध्ये बालेन शाह यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ; ठरले नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान (Photo-X)
आंतरराष्ट्रीय

नेपाळमध्ये बालेन शाह यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ; ठरले नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान

काठमांडूचे माजी महापौर आणि रॅपर-राजकारणी अशी ओळख असलेले बालेन शाह (बलेंद्र शाह) यांनी नेपाळचे देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शुक्रवारी शपथ घेतली.

Swapnil S

काठमांडू : काठमांडूचे माजी महापौर आणि रॅपर-राजकारणी अशी ओळख असलेले बालेन शाह (बलेंद्र शाह) यांनी नेपाळचे देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शुक्रवारी शपथ घेतली. बालेन यांनी आपल्या पक्षाला प्रचंड विजय मिळवून दिला आणि नेपाळमधील दीर्घकाळ चाललेल्या राजकीय घराण्यांचे व पारंपरिक पक्षांचे वर्चस्व संपुष्टात आणले. गुरुवारी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे संसदीय नेते म्हणून बालेन शाह यांची निवड झाली.

संसदीय पक्षाच्या बैठकीत बालेन यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली, त्यामुळे ते देशाच्या सर्वोच्च कार्यकारी पदासाठी औपचारिकपणे पात्र ठरले आहेत, असे आरएसपीच्या केंद्रीय संघटन समितीचे सचिव शंकर श्रेष्ठ यांनी सांगितले.

आरएसपीच्या केंद्रीय समितीने शाह यांना त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ स्थापन करण्याचे अधिकारही दिले आहेत, असे श्रेष्ठ यांनी सांगितले.

आरएसपीने प्रतिनिधी सभेच्या २७५ पैकी १८२ जागा मिळवून निवडणुकीत विजय मिळवला. भ्रष्टाचारमुक्त शासनाची मागणी करणाऱ्या हिंसक ‘जनरेशन झेड’च्या आंदोलनानंतरच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी पक्षांचा पराभव केला.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन