नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे घरे, पूल वाहून गेले; ८० हून अधिक जणांची सुटका, ५ बेपत्ता  (Photo-X)
आंतरराष्ट्रीय

नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे घरे, पूल वाहून गेले; ८० हून अधिक जणांची सुटका, ५ बेपत्ता, Video

नेपाळमधील गोरखा जिल्ह्यात बुढी गंडकी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे घरे आणि पूल वाहून गेले, तसेच जलविद्युत प्रकल्पांचेही नुकसान झाले.

Swapnil S

काठमांडू : नेपाळमधील गोरखा जिल्ह्यात बुढी गंडकी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे घरे आणि पूल वाहून गेले, तसेच जलविद्युत प्रकल्पांचेही नुकसान झाले. या घटनेत नऊ परदेशी नागरिकांसह ८० हून अधिक लोकांची सुटका करण्यात आली असून, पाच जण अद्याप बेपत्ता आहेत.

‘नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट ॲॅथॉरिटी'ने दिलेल्या माहितीनुसार, गोरखा जिल्ह्यात चार हेलिकॉप्टर्सच्या मदतीने नऊ परदेशी नागरिकांसह ८२ जणांची सुटका करण्यात आली आहे. दोन महिलांसह पाच जण अद्याप बेपत्ता आहेत.

या पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे दोन लटकते पूल, वाहनांसाठीचे दोन पूल, तीन जलविद्युत प्रकल्प आणि ३४ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच, ४५ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून २७ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. याशिवाय तीन वाहनेही वाहून गेली आहेत, असे ॲॅथॉरिटीने सांगितले.

प्रशासनाने १७१ नेपाळी सैनिकांसह ७०० हून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांना मदतकार्यासाठी तैनात केले आहे. त्यांनी बाधित भागांत तंबू, ब्लँकेट्स, गाद्या, स्लीपिंग बॅग्ज आणि स्वयंपाकाचे संच पोहोचवले आहेत.

पुरामुळे सल्लेरी, पैयुका आणि जगत येथील नदीपात्रातील घरे, तसेच एका वॉर्डला जोडणारा लटकता पूल वाहून गेला, अशी माहिती चुमनुबरी ग्रामीण नगरपालिका-३ चे वॉर्ड अध्यक्ष राम कुमार गुरुंग यांनी ‘काठमांडू पोस्ट’ला दिली.

गोरखा जिल्ह्यातील चुमचेटजवळ दरड कोसळल्यामुळे निर्माण झालेला तात्पुरता अडथळा (नैसर्गिक बांध) फुटल्याने हा पूर आला असावा, असे ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट’ने नेपाळच्या प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे एका निवेदनात म्हटले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

CJP Protest : आंदोलन होणार तीव्र; झुरळांचा इशारा, ‘इंडिया’ आघाडीसह सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन

‘इंडिया’ आघाडीचा आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा; राहुल गांधींनी दिली माहिती

Delhi Protest : शांततापूर्ण आंदोलनांवर कारवाई नको; सर्वोच्च न्यायालयाची तंबी, मेट्रो, इंटरनेट सेवा पूर्ववत करा

दुष्काळग्रस्तांसाठी पुढील सहा ते आठ महिन्यांचे नियोजन करा; केंद्रीय पथकांसोबतच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Weather Update : मुंबई तापली; पारा ३८ अंशांवर