नेपाळ पूरातील बेपत्ता २१३ भारतीयांना मृत घोषित करण्याची प्रक्रिया सुरू (Photo-X)
आंतरराष्ट्रीय

नेपाळ पूरातील बेपत्ता २१३ भारतीयांना मृत घोषित करण्याची प्रक्रिया सुरू

नेपाळमध्ये ऑगस्टमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर बेपत्ता झालेल्या २१३ भारतीय नागरिकांना मृत घोषित करण्याची प्रक्रिया नेपाळ सरकारने सुरू केली आहे.

Swapnil S

काठमांडू : नेपाळमध्ये ऑगस्टमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर बेपत्ता झालेल्या २१३ भारतीय नागरिकांना मृत घोषित करण्याची प्रक्रिया नेपाळ सरकारने सुरू केली आहे. त्रिशूली-भोटेकोशी नदीप्रणालीत २६ ऑगस्ट रोजी आलेल्या पुरात किमान १,५०० जणांचा मृत्यू झाला होता. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करणे व व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीआरआरएमए) बेपत्ता नेपाळी आणि परदेशी नागरिकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ३,९१५ जणांचा समावेश असून, त्यात ३,२९२ नेपाळी आणि १९ देशांतील ६२३ परदेशी नागरिक आहेत.

बाधितांना २ डिसेंबरपूर्वी संपर्क साधण्याचे आवाहन

यादीतील नावांबाबत हरकती, दुरुस्ती किंवा बदल सुचवण्यासाठी नेपाळ सरकारने मुदत दिली आहे. भारतीय दूतावासाने संबंधित कुटुंबीयांना २ डिसेंबरपूर्वी ई-मेल किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर नेपाळ सरकार अंतिम यादी जाहीर करून मृत्यूची अधिकृत घोषणा करणार आहे. पुढे भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाकडून मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

प्रत्येक फ्लॅटसाठी प्रॉपर्टी कार्ड; राज्यातील सात कोटी फ्लॅटधारकांना मिळणार दिलासा, राज्य सरकारचा प्रस्ताव

हाय फॅट, साखर, मिठाची स्वतंत्र इशारा चिन्हे अनिवार्य; पाकीटबंद खाद्यपदार्थांबाबत सुप्रीम कार्टाचा आदेश

वॉशिंग सेंटर : पाणी वापरावर बंदी; पिण्याचे पाणी न वापरण्याबाबत राज्य सरकारचा प्रस्ताव, गृहनिर्माण सोसायट्यांवरही निर्बंधांची शक्यता

कॉफी डे एंटरप्रायझेसच्या व्यवहारांची चौकशी होणार; निधी वळवल्याप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिटर नियुक्त

Navi Mumbai : तुर्भे रेल्वे उड्डाणपूल चार महिने वाहतुकीसाठी बंद; ३१ मार्चपर्यंत वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग