पुष्पकमल दहल प्रचंड यांचे संग्रहित छायाचित्र PTI
आंतरराष्ट्रीय

विश्वासदर्शक ठरावात नेपाळचे पंतप्रधान ‘प्रचंड’ पराभूत; ओली होणार नवे पंतप्रधान

नेपाळमध्ये पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांचा संसदेत विश्वासदर्शक ठरावात पराभव झाला आहे. सत्तारूढ आघाडीतील सीपीएन-यूएमएल पक्षाने पाठिंबा काढून घेतल्याने दहल यांना पराभव पत्करावा लागला.

Swapnil S

काठमांडू : नेपाळमध्ये पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांचा संसदेत विश्वासदर्शक ठरावात पराभव झाला आहे. सत्तारूढ आघाडीतील सीपीएन-यूएमएल पक्षाने पाठिंबा काढून घेतल्याने दहल यांना पराभव पत्करावा लागला. आता नेपाळमध्ये माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे.

लोकप्रतिनिधी सभागृहात ‘प्रचंड’ यांना २७५ पैकी केवळ ६३ मते मिळाली आणि ठरावाविरुद्ध १९४ मते पडली. विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी किमान १३८ मतांची आवश्यकता असते. प्रचंड यांनी २५ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. यापूर्वी त्यांनी चार विश्वासदर्शक ठराव जिंकले होते.

के. पी. शर्मा ओली यांच्या सीपीएन-यूएमएल पक्षाने सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेसशी करार केला. त्यामुळे आता नेपाळी काँग्रेस आणि सीपीएन-यूएमएलचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नेपाळी काँग्रेसचे ८९, तर सीपीएन-यूएमएलचे ७८ सदस्य आहेत. नेपाळी काँग्रेसचे नेते शेर बहादूर देऊबा यांनी अगोदरच पंतप्रधान म्हणून ओली यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

पूरग्रस्तांना मदतीचा हात! राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

लडाखमधील हिंसाचारानंतर सोनम वांगचुक CBI च्या रडारवर; NGO ची चौकशी सुरू, संस्थेचा परवाना रद्द

मराठा समाज बांधवांना तूर्तास दिलासा; हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे थांबवा; कुणबी समाजाची मागणी

उद्या मध्य रेल्वेवर भायखळा, शीव पुलाच्या कामासाठी रात्रीचा ब्लॉक; एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम