नेपाळ पुन्हा अस्वस्थ, ओलींच्या समर्थनार्थ निदर्शने (Photo-X)
आंतरराष्ट्रीय

नेपाळ पुन्हा अस्वस्थ, ओलींच्या समर्थनार्थ निदर्शने

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या 'जेन-झेड' (Gen-Z) आंदोलनादरम्यान बळाचा वापर केल्याच्या आरोपावरून नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Swapnil S

काठमांडू : गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या 'जेन-झेड' (Gen-Z) आंदोलनादरम्यान बळाचा वापर केल्याच्या आरोपावरून नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने एक जण जखमी झाला असून पोलिसांनी ९ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

काठमांडू जिल्हा न्यायालयाने माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. शनिवारी कटुंजे आणि गुंडू येथून अटक केल्यानंतर रविवारी दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ च्या कार्यकर्त्यांनी ओली यांच्या अटकेचा निषेध करत काठमांडूमध्ये निदर्शने केली. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात वाद होऊन तणाव वाढला. आंदोलकांनी दगडफेक केल्यावर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. पक्षाध्यक्ष के.पी. शर्मा ओली आणि नेते रमेश लेखक यांची तात्काळ सुटका करावी, गृहमंत्री सुधन गुरुंग यांनी राजीनामा द्यावा, ८ आणि ९ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या घटनांची निष्पक्ष चौकशी व्हावी इत्यादी त्यांच्या मागण्या आहेत. ८ आणि ९ सप्टेंबर २०२५ च्या आंदोलनादरम्यान झालेल्या मृत्यूंप्रकरणी सरकारने ओली आणि लेखक यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले आहेत. सुनावणी दरम्यान रमेश लेखक यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आले, तर के.पी. शर्मा ओली यांनी त्रिभुवन विद्यापीठ शिक्षण रुग्णालयातून (TUTH) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. ओली सध्या रुग्णालयात दाखल आहेत.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन