संग्रहित छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

उत्तर कोरियाकडून समुद्राच्या दिशेने क्षेपणास्त्रांची चाचणी; आशियाई देशांमध्ये तणाव

संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) अणुऊर्जा संस्थेने उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र निर्मितीच्या वाढत्या वेगाबद्दल गंभीर इशारा दिल्यानंतर काही दिवसांतच ही चिथावणीखोर कारवाई करण्यात आली.

Krantee V. Kale

सोल : उत्तर कोरियाने रविवारी सकाळी समुद्राच्या दिशेने अनेक कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) अणुऊर्जा संस्थेने उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र निर्मितीच्या वाढत्या वेगाबद्दल गंभीर इशारा दिल्यानंतर काही दिवसांतच ही चिथावणीखोर कारवाई करण्यात आली आहे.

दक्षिण कोरियाच्या 'जॉइंट चिफ्स ऑफ स्टाफ'ने दिलेल्या माहितीनुसार, ही क्षेपणास्त्रे उत्तर कोरियाच्या सिनपो परिसरातून डागण्यात आली. या क्षेपणास्त्रांनी पूर्व समुद्राच्या दिशेने साधारण १४० किलोमीटर (८७ मैल) प्रवास केला. या घटनेनंतर दक्षिण कोरियाचे लष्कर हाय अलर्टवर असून, ते अमेरिका आणि जपानसोबत सातत्याने माहितीची देवाणघेवाण करत आहेत.

दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने तातडीची बैठक बोलावून या चाचण्यांचा तीव्र निषेध केला आहे. विशेष म्हणजे, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जाय-म्युँग भारत आणि व्हिएतनामच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी काही तास आधी ही क्षेपणास्त्र डागण्यात आली.

राजकीय संदर्भ

तज्ज्ञांच्या मते, उत्तर कोरियाच्या या सातत्याच्या चाचण्यांचे कनेक्शन अमेरिकेच्या राजकारणाशी असू शकते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आगामी मे महिन्यात चीनमध्ये शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. या भेटीपूर्वी आपली ताकद दाखवून भविष्यातील चर्चेत वरचढ ठरण्यासाठी किम जोंग उन हे दबावतंत्र वापरत असल्याचे बोलले जात आहे.

औद्योगिक जमिनींसाठी GST सारखी स्वतंत्र परिषद हवी; नियमात सुसूत्रता आणण्यासाठी 'सीआयआय'ची शिफारस

जम्मू-काश्मीर बस अपघात: उधमपूरमध्ये बस दरीत कोसळून १५ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

मोदींकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप

परतवाडा प्रकरणात होणार मोठा पर्दाफाश? आरोपींच्या ५ पैकी ३ मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश

तृणमूल काँग्रेसमुळे बंगालची संस्कृती धोक्यात; मोदींचा तृणमूलवर घणाघाती हल्ला