पाकचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, १६ ठार  Photo : ANI
आंतरराष्ट्रीय

पाकचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, १६ ठार

पाकिस्तानी लष्कराने रविवारी (दि. २२) पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला केला. या हल्ल्यात १६ जण ठार झाले आहेत. तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित सात छावण्या आणि ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, असा दावा पाकिस्तानी लष्कराने केला.

Swapnil S

इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराने रविवारी (दि. २२) पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला केला. या हल्ल्यात १६ जण ठार झाले आहेत. तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित सात छावण्या आणि ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, असा दावा पाकिस्तानी लष्कराने केला.

पाकिस्तान सरकारने या हल्ल्याला अलीकडील आत्मघाती हल्ल्यांनंतरचा प्रतिहल्ला म्हटले आहे. आमच्याकडे ठोस पुरावे आहेत की हे हल्ले अफगाणिस्तानच्या भूमीतून चालवल्या जाणाऱ्या नेटवर्कने घडवून आणले. गुप्तचर माहितीच्या आधारे हे ऑपरेशन राबवण्यात आधारे हे ऑपरेशन राबवण्यात आले, असे पाकिस्तानने एका निवेदनाद्वारे जाहीर केले.

या हल्ल्यात नांगरहारमधील एका घराला लक्ष्य करण्यात आले, ज्यामुळे एकाच कुटुंबातील २३ लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले. आतापर्यंत केवळ चार लोकांना बाहेर काढता आले आहे. हल्ल्याच्या वेळी कुटुंब झोपले होते, त्यामुळे त्यांना पळून जाण्याची संधीच मिळाली नाही. अमेरिकन मानवाधिकार संघटना ‘इंटरनॅशनल ह्युमन राइट्स फाउंडेशन’नुसार (आयएचआरएफ) या हल्ल्यात १६ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे.

सुप्रीम कोर्टात WhatsAppचा यू-टर्न; युजर्सच्या संमतीशिवाय डेटा शेअरिंग नाही, स्पर्धा आयोगाच्या आदेशांची अंमलबजावणी मान्य

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेनच्या स्वप्नाला वेग; जपानमध्ये भारतीय लोको पायलटांचे विशेष प्रशिक्षण, Video व्हायरल

प्रसाधनगृहाच्या दारावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा? हरयाणातील संतापजनक प्रकार, नेटकरी भडकले; Video व्हायरल

JNU मध्ये पुन्हा हिंसाचार! मध्यरात्री डाव्या-उजव्या विद्यार्थी संघटनांत धुमश्चक्री; हाणामारी, दगडफेक, धावपळीत अनेकजण जखमी

ड्रग माफिया El Mencho ठार, मेक्सिकोत उसळला हिंसाचार; महामार्ग बंद, उड्डाणे रद्द; भारतीय दूतावासाचा 'घरातच थांबा' सल्ला