आंतरराष्ट्रीय

जेरुसलेममध्ये पॅलेस्टिनी अतिरेक्याच्या गोळीबारात तीन इस्रायली नागिरक ठार, युद्धविराम सातव्या दिवशीही कायम

नवशक्ती Web Desk

जेरुसलेम : पॅलेस्टिनी बंदुकधाऱ्याने केलेल्या गोळीबारात किमान तीन इस्रायली नागरिक ठार धाले तर सहा जण जखमी धाले. जेरुसलेम येथील बसथांब्यावर हा गोळीबार करण्यात आल्याने सध्या चालू असलेल्या स्थितीमध्ये आणखी एक ठिणगी पडली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी पावणे आठच्या सुमारास हा गोळीबार वैझमन स्ट्रीट येथे केला गेला. असे असूनही युद्धविराम सातव्या दिवशीही कायम राहिला आहे.

या गोळीबारानंतर लगेच कर्तव्यावर नसलेल्या दोन जवानांनी आणि एका सश्स्त्र नागरिकानेही या हल्लेखोरांना उत्तर दिले, त्यात दोन पॅलेस्टिनी अतिरेकी ठार झाले.

इस्रायलच्या अंतर्गत सुरक्षा एजन्सी शिन बेटने दोन हल्लेखोरांची नावे मुराद नम्र (३८) आणि इब्राहिम नम्र (३०) अशी असल्याचे सांगितले. पूर्व जेरुसलेममधील ते दोघे असून ते भाऊ भाऊ आहेत.हे दोघे हमासचे सदस्य होते आणि यापूर्वी दहशतवादी कारवायांसाठी तुरुंगात होते.

गाझा पट्टीमध्ये दहशतवादी घटकांच्या निर्देशानुसार दहशतवादी हल्ल्यांची योजना आखल्याबद्दल मुरादला २०१० ते २०२० दरम्यान तुरुंगात टाकण्यात आले होते आणि इब्राहिमला २०१४ मध्ये अज्ञात दहशतवादी कारवायांसाठी तुरुंगात टाकण्यात आले होते, असे त्यात म्हटले आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त