आंतरराष्ट्रीय

भारतीयांचे नुकसान करून ब्राह्मणांचे खिसे भरता; ट्रम्प यांचे सल्लागार नवारो पुन्हा बरळले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापारविषयक सल्लागार पीटर नवारो यांनी भारताला रशियाचे ‘धुणीघर’ असे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर सामान्य भारतीयांचे नुकसान करून तुम्ही ब्राह्मणांचा फायदा करून देत आहात, असेही विधान त्यांनी केले असून त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

Swapnil S

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापारविषयक सल्लागार पीटर नवारो यांनी भारताला रशियाचे ‘धुणीघर’ असे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर सामान्य भारतीयांचे नुकसान करून तुम्ही ब्राह्मणांचा फायदा करून देत आहात, असेही विधान त्यांनी केले असून त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आकारल्यामुळे भारतीयांची नाराजी ओढवून घेतली असतानाच नवारो आपल्या विधानांनी त्यात भर घालत आहेत. नवारो यांनी गेल्या काही दिवसांत भारत व भारतीयांबाबत टीकात्मक सूर लावला आहे. ट्रम्प यांनी भारतावर आधी २५ टक्के आणि नंतर रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो म्हणून अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू केले आहे. यासंदर्भात भारताने अधिकृत भूमिका अद्याप जाहीर केलेली नसताना नवारो मात्र एकामागून एक भारतविरोधी विधाने करत असल्यामुळे अमेरिका व भारत यांच्यातील संबंध कमालीचे तणावपूर्ण होताना दिसत आहेत. नवारो यांच्या ताज्या विधानाचीही त्यात भर पडली आहे.

नवारो यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये यासंदर्भात भूमिका मांडली आहे. भारतातील काही निवडक श्रीमंत व्यावसायिकांचाच आर्थिक फायदा करून दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भारत म्हणजे रशियासाठी फक्त धुणीघर आहे. भारतीयांचे नुकसान करून ब्राह्मणांचे खिसे भरताय. आपल्याला ते थांबवावे लागेल, असे पीटर नवारो म्हणाले.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता