आंतरराष्ट्रीय

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

युक्रेनच्या निप्रो शहरावर गुरुवारी सकाळी रशियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला केला. रशियाच्या अस्त्राखान भागातून हे हल्ले केले गेले.

Swapnil S

मॉस्को : युक्रेनच्या निप्रो शहरावर गुरुवारी सकाळी रशियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला केला. रशियाच्या अस्त्राखान भागातून हे हल्ले केले गेले.

युक्रेनच्या हवाई दलाने दावा केला की, रशियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्राबरोबरच सात ‘केएच-१०१’ क्रूझ क्षेपणास्त्राने हल्ले केले. त्यातील ६ क्षेपणास्त्रे आम्ही पाडली. रशियाने युक्रेनवर किन्जल हायपरसोनिक क्षेपणास्त्रेही डागली.

रशियाने गेल्या महिन्यात सांगितले की, ‘नाटो’ देशांच्या शस्त्रास्त्रांचा वापर रशियाच्या जमिनीवर होत असल्यास ती तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात असेल.

रशियाने गेल्याच वर्षी युक्रेन युद्धाच्या काळात दीर्घकालीन ‘आरएस २८ सरमत’ आंतरखंडीय क्षेपणास्त्र तैनात केली होती.

रशियाने १९ नोव्हेंबरला दावा केला की, युक्रेनने पहिल्यांदा त्यांना अमेरिकेकडून मिळालेली दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागली. यातील ५ क्षेपणास्त्र रशियाने पाडली.

युक्रेन व अमेरिकन अधिकाऱ्यांनीही रशियावर दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राने हल्ला केल्याबाबत दुजोरा दिला आहे.

पंतप्रधान नेतन्याहू विरोधात अटक वॉरंट

गुन्हा व युद्ध गुन्ह्यांसाठी पंतप्रधान नेतन्याहू व इस्रायलचे संरक्षण मंत्री योआव गॅलंट व ‘हमास’चा लष्करी प्रमुख मोहम्मद डैफ यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले जात आहे, असे न्यायालयाने सांगितले. गाझात इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्याच्या विरोधातील ही कायदेशीर कारवाई आहे. ‘हमास’ला संपवण्याच्या नावाखाली इस्रायली सैन्य निर्दोष नागरिकांची कत्तल करत आहे. दरम्यान, इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत ४४ हजार गाझावासीयांचा मृत्यू झाला आहे.

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

उपोषणकर्त्या शेतकऱ्याला घरी बोलावून पाजला ज्यूस; "किती ही सत्तेची मस्ती"...रोहित पवारांचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल

Mumbai : घर बदलणं महागात पडलं! 'मूव्हर्स अँड पॅकर्स'च्या कर्मचाऱ्यांनी ६.८ लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास; गुन्हा दाखल

Mumbai : १५ वर्षांनंतर MMRDA चा निर्णय; वडाळा ट्रक टर्मिनल प्लॉटचा १,६२९ कोटींना लिलाव होणार

'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन