Photo : X (@JBNyamate)
आंतरराष्ट्रीय

सौदी अरेबियाच्या 'स्लीपिंग प्रिन्स'चे निधन; २० वर्षांपासून सुरू होती मृत्यूशी झूंज

सौदी अरेबियाचे राजकुमार अल वालिद बिन खालिद बिन तलाल अल सौद यांचे शनिवारी निधन झाले.

Swapnil S

रियाध : सौदी अरेबियाचे राजकुमार अल वालिद बिन खालिद बिन तलाल अल सौद यांचे शनिवारी निधन झाले. ते गेल्या २० वर्षांपासून कोमात होते. त्यांना ‘स्लीपिंग प्रिन्स’ म्हणून ओळखले जात असे.

प्रिन्स अल वालिद हे सौदी राजघराण्यातील ज्येष्ठ सदस्य प्रिन्स खालेद बिन तलाल यांचे पुत्र आणि अब्जाधीश प्रिन्स अल वालिद बिन तलाल यांचे पुतणे होते. त्यांचा जन्म एप्रिल १९९० मध्ये झाला. २००५ मध्ये लंडनमध्ये लष्करी प्रशिक्षणादरम्यान त्यांना एक मोठा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाला. त्यानंतर ते कोमात गेले होते.

मुंबईकरांसाठी आनंद वार्ता! वर्षअखेर ५० किमी मेट्रो मार्ग येणार सेवेत; MMRDA चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची माहिती

IND Vs ENG: भारतापुढे बरोबरी साधण्याचे आव्हान! आजपासून इंग्लंडविरुद्ध चौथी कसोटी, योग्य संघनिवडीचा गिल-गंभीरसमोर पेच

येऊर परिसरात गटारीला ‘नो एन्ट्री’; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

सोने पुन्हा १ लाखांवर; चांदीचा भाव ३,००० रुपयांनी वाढला

‘मिग-२१’ लढाऊ विमान निवृत्त होणार; ‘उडती शवपेटी’ म्हणून ओळख, १९ सप्टेंबरला एक ‘अध्याय’ संपणार