आंतरराष्ट्रीय

शुभांशू शुक्ला यांची अंतराळवीर म्हणून निवड; 'भारत-अमेरिका अंतराळ मोहिमेत सहभागी होणार'

भारत-अमेरिका अंतराळ मोहिमेवर भारतातर्फे सर्वात तरुण अंतराळवीर म्हणून ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची निवड ‘इस्रो’ने केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारत-अमेरिका अंतराळ मोहिमेवर भारतातर्फे सर्वात तरुण अंतराळवीर म्हणून ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची निवड ‘इस्रो’ने केली आहे. शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांचे प्रशिक्षण याच महिन्यात सुरू होणार आहे.

शुभांशू हे ‘एनडीए’चे माजी विद्यार्थी असून ते २००६ मध्ये लढाऊ वैमानिक म्हणून भारतीय हवाई दलात दाखल झाले. शुभांशू हे टेस्ट पायलट असून त्यांना २ हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी सुखोई ३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जग्वार, हॉक, डॉर्नियर, एन-३२ आदी विमानांचे सारथ्य त्यांनी केले आहे.

रशिया-अमेरिकेत कठोर प्रशिक्षण

शुभांशू यांनी रशिया-अमेरिकेत कठोर प्रशिक्षण घेतले आहे. ‘इस्रो’च्या या मोहिमेच्या निवडीपूर्वी ते गगनयान मोहिमेसाठी निवडले गेले होते. शुक्ला यांच्यासोबत सहअंतराळवीर म्हणून ग्रुप कॅप्टन प्रशांक नायर यांची निवड झाली आहे. नायर हे ‘अ’ दर्जाचे वैमानिक प्रशिक्षक आहेत. त्यांना ३ हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव असून ते टेस्ट पायलट आहेत. त्यांनी सुखोई ३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जग्वार, हॉक, डॉर्नियर, एन-३२ आदी विमानांचे सारथ्य केले आहे.

कस्तुरीरंगन समितीच्या शिफारसी

२०१३ मध्ये केंद्र सरकारने अंतराळ शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय कार्यगट नेमला होता. या कार्यगटाने पश्चिम घाटाच्या पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासासाठी शिफारसी केल्या होत्या. या गटाने पश्चिम घाटातील ३७ टक्के म्हणजे, ५९,९४० चौरस किमी परिसर पर्यावरण संवेदनशील जाहीर केला होता. आतापर्यंत उच्चस्तरीय कार्यगटाने अधिसूचनेचे पाच मसुदे जाहीर केले आहेत.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश