Photo : X
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात दोन बॉम्बस्फोटांत ७ ठार, ३ जखमी

पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तुनख्वा प्रांतात शनिवारी रस्त्याच्या कडेला झालेल्या दोन लागोपाठ बॉम्बस्फोटांत किमान सात जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

Swapnil S

पेशावर : पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तुनख्वा प्रांतात शनिवारी रस्त्याच्या कडेला झालेल्या दोन लागोपाठ बॉम्बस्फोटांत किमान सात जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

हा स्फोट बानू जिल्ह्यातील मारका बेरा भागात झाला. बानूचे जिल्हा पोलीस अधिकारी यासिर आफ्रिदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला स्फोट रस्त्याच्या कडेला पेरलेल्या आयईडीमुळे झाला. एका प्रवासी व्हॅनला या स्फोटाचा तडाखा बसला आणि ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर अवघ्या काही वेळातच, बचावकार्यासाठी जमा झालेल्या लोकांना लक्ष्य करून त्याच ठिकाणी दुसरा स्फोट करण्यात आला. या दुसऱ्या स्फोटात आणखी दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. ही प्रवासी व्हॅन हाथी खेल गावातून बानू शहराकडे जात असताना हा अपघात झाला.

निषेध, चौकशीचे आदेश

सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून स्फोटाच्या ठिकाणाहून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून पोलीस प्रशासनाला या प्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचे देवेंद्र फडणवीसांनी केले कौतुक; अन्न भेसळीविरोधात धडक कारवाई सुरू ठेवण्याची दिली ग्वाही

राहुल गांधींची सभा रोखण्यासाठी पुण्यात जमावबंदीचे आदेश; काँग्रेसचा आरोप

उच्चस्तरीय समिती स्थापण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; दिल्ली विद्यार्थी आंदोलनातील पोलिसांच्या अतिरेकाची चौकशी

राम मंदिर देणगी चोरी प्रकरण : चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना SIT कडून ‘क्लीनचिट’

पंढरपूरसाठी पुनर्वसन धोरण; जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ६,४७७ कोटींची तरतूद, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले मोठे निर्णय