बशर अल असद एएनआय
आंतरराष्ट्रीय

सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर असद यांचे पलायन; बंडखोरांचा सीरियावर कब्जा

सीरियात सुरू असलेल्या अंतर्गत युद्धात बंडखोर गटाची सरशी झाल्याने राष्ट्राध्यक्ष बशर अल असद हे देश सोडून पळून गेले आहेत. बंडखोरांनी राजधानी दमास्कससह सीरियावर ताबा मिळवला असून असद कुटुंबाची गेल्या ५० वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. गेल्या ११ दिवसांपासून बंडखोर गट आणि सीरियन लष्कर यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू होता.

Swapnil S

दमास्कस : सीरियात सुरू असलेल्या अंतर्गत युद्धात बंडखोर गटाची सरशी झाल्याने राष्ट्राध्यक्ष बशर अल असद हे देश सोडून पळून गेले आहेत. बंडखोरांनी राजधानी दमास्कससह सीरियावर ताबा मिळवला असून असद कुटुंबाची गेल्या ५० वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. गेल्या ११ दिवसांपासून बंडखोर गट आणि सीरियन लष्कर यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू होता.

रविवारी सकाळी बंडखोरांनी राजधानी दमास्कसमध्ये प्रवेश केला व असद यांनी तुरुंगात टाकलेल्या बंडखोरांना मुक्त केले. असद यांनी देश सोडल्यानंतर सीरियाच्या पंतप्रधानांनी बंडखोरांच्या हाती सत्ता सोपवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पंतप्रधान मोहम्मद गाझी अल जलाली यांनी आपण देशातच राहणार असून, सीरियातील लोक ज्याला निवडतील त्यांच्यासोबत काम करणार असल्याचे सांगितले.

गेल्या आठवडाभरात बंडखोरांनी सीरियातील अलेप्पो, हमा, होम्स आणि दारा या चार प्रमुख शहरांवर कब्जा केला. बंडखोर सैनिकांनी दारा शहर ताब्यात घेतल्यानंतर ६ डिसेंबरला राजधानी दमास्कसमध्ये प्रवेश केला. दारा हे तेच शहर आहे जिथे २०११ मध्येही राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधात बंडखोरी सुरू झाली आणि देशभरात यादवी युद्ध सुरू झाले. दारा ते राजधानी दमास्कसमधील अंतर सुमारे १०० किमी असून, स्थानिक बंडखोरांनी या भागावर कब्जा केला आहे.

नागरिकांनी साजरा केला आनंदोत्सव

या संघर्षामुळे आतापर्यंत ३.७० लाख लोक विस्थापित झाले आहेत. असद सरकार कोसळल्यानंतर सीरियन नागरिकांनी रणगाड्यांवर चढून आपला आनंद व्यक्त केला. ठिकठिकाणी असद यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच गाड्यांचे हॉर्न वाजवून जल्लोष करण्यात आला. लोकांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात घुसून असद यांचे पोट्रेट फाडून टाकले, तसेच तेथील सामान लुटले.

बशर असद अज्ञातस्थळी रवाना

बशर अल-असद यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडले असून, ते सीरिया सोडून अज्ञातस्थळी गेले आहेत. त्यांनी शांततेने बंडखोर गटांना सत्ता सोपवण्याचे मान्य केले, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. बशर असद यांना रशियाचा पाठिंबा होता.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली