Nasa Twitter handle 
आंतरराष्ट्रीय

जेम्स वेब टेलीस्कोपने प्रसिद्ध केला पहिला फोटो, विश्वाचे कोडे उलगडणार

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनीही या खास प्रसंगी सांगितले की, आपल्या सर्वांसाठी हा अतिशय रोमांचक क्षण आहे. आजचा दिवस विश्वासाठी एक नवीन अध्याय आहे.

वृत्तसंस्था

अमेरिकेतील स्पेस एजन्सी नासाने जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमधून पहिला फोटो जारी केला आहे. हा फोटो ब्रह्माण्डाचा पहिला हाय-रिझोल्यूशन कलर फोटो आहे. या लहान कणांपैकी एकावर तुम्हाला दिसणारा प्रकाश 13 अब्ज वर्षांपासून प्रवास करत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाइट हाऊसच्या ब्रीफिंगमध्ये याबाबत माहिती दिली. फोटो जारी करताना बायडेन म्हणाले - आजचा दिवस ऐतिहासिक आहे. हे अमेरिकेसाठी आणि संपूर्ण मानवजातीसाठी ऐतिहासिक आहे. हे फोटो जगाला सांगतात की अमेरिका किती मोठ्या गोष्टी करू शकते. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनीही या खास प्रसंगी सांगितले की, आपल्या सर्वांसाठी हा अतिशय रोमांचक क्षण आहे. आजचा दिवस विश्वासाठी एक नवीन अध्याय आहे.

हा कार्यक्रम यूएस इतिहासातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय अंतराळ विज्ञान प्रकल्प आहे. नासाचे दुसरे प्रमुख 'जेम्स वेब' यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. कालांतराने नासाने या दुर्बिणीत अनेक प्रगत तंत्रज्ञान जोडले आहे. यातून विश्वाची अनेक रहस्ये उलगडू शकतात.

BCCI कडून महाभियोगची तयारी; कुणकुण लागताच मोहसीन नक्वींनी UAE बोर्डाकडे सुपूर्द केली ट्रॉफी : रिपोर्ट

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार