डोनाल्ड ट्रम्प संग्रहित छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

हे तर अमेरिकेसाठी अन्यायकारक - ट्रम्प

अमेरिकेतील करांपासून वाचण्यासाठी एलॉन मस्क हे भारतात टेस्लाचा कारखाना उभारत असल्यास ते अमेरिकेसाठी अन्यायकारक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिकेतील करांपासून वाचण्यासाठी एलॉन मस्क हे भारतात टेस्लाचा कारखाना उभारत असल्यास ते अमेरिकेसाठी अन्यायकारक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. १३ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊस येथे बैठक झाली होती. तत्पूर्वी, अमेरिकेच्या अध्यक्षांनी ‘जशास तसे’ कर लावण्याची घोषणा केली होती. ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीत मी त्यांना भारत हा सर्वात जास्त कर लावत असल्याचे सांगितले. त्यामुळे मस्क यांना भारतात कार विकणे कठीण बनत आहे.

जगातील प्रत्येक देश हा अमेरिकेचा फायदा उचलत आहे. ते भरमसाट कर आकारतात. त्यामुळे कार विकणे अशक्य आहे. विशेष करून भारतात, असे ते म्हणाले. मस्क यांना भारतात कारखाना टाकायचा आहे. ठीक आहे. पण, अमेरिकेसाठी ती बाब अन्यायकारक आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने भारतात भरतीसाठी जाहिरात दिली आहे. याचाच अर्थ कंपनी भारतात प्रवेश करणार आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, मुंबई उपनगरीय विभागात कंपनीने ही पदे भरण्याचे ठरवले आहे.

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट; दोन दिवस मुंबईत मुसळधार; रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट 

Mumbai : विद्यार्थ्याचा करुण अंत; चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळले

सचिन अहिर शिंदे सेनेत; ठाकरे गटाला आणखी एक हादरा; थेट 'परिषदे'च्या उपसभापतीपदाची उमेदवारी

Mumbai : मोडकसागर धरणाला गळती; पूर नियंत्रण दरवाजांचे दोन्ही रबर सील नादुरुस्त; दुरुस्तीसाठी पालिका करणार ९८ लाख रुपये खर्च

अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायम