आंतरराष्ट्रीय

व्यापारयुद्ध पेटले; कॅनडाचे अमेरिकेला जशास तसे प्रत्युत्तर

अमेरिकेने कॅनडा, मेक्सिकोवर २५ टक्के व चीनवर १० टक्के कर लावल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले असून या देशांमध्ये व्यापारयुद्धाने पेट घेतला आहे.

Swapnil S

ओटावा : अमेरिकेने कॅनडा, मेक्सिकोवर २५ टक्के व चीनवर १० टक्के कर लावल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले असून या देशांमध्ये व्यापारयुद्धाने पेट घेतला आहे. अमेरिकेला जशास तसे प्रत्युत्तर म्हणून आता कॅनडाने अमेरिकन मालावर २५ टक्के कर लावला आहे. मेक्सिकोही अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे, तर चीन याबाबत जागतिक व्यापार संघटनेकडे दाद मागणार आहे.

कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी सांगितले की, ३० अब्ज डॉलरच्या अमेरिकन मद्य व फळांवर मंगळवारपासून नवीन कर लावला जाईल. दरम्यान, कॅनडाहून अमेरिकेत येणाऱ्या मालावर मंगळवारपासून कर लादला जाणार आहे.

मेक्सिकोही अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत

मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लाऊडिया शिनबाम यांनीही आपल्या देशाच्या अर्थमंत्र्यांना प्रत्युत्तरादाखल अमेरिकेविरुद्ध शुल्क व अन्य उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मेक्सिकोचे गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असल्याचे ट्रम्प यांचे आरोप शिनबाम यांनी फेटाळले. अमेरिकन सरकारला फेंटेनाईलचा खप रोखायचा असल्यास त्यांनी आपल्या रस्त्यावरील अमली पदार्थांची विक्री व मनी लाँड्रिंगविरोधात कारवाई केली पाहिजे. गेल्या चार महिन्यांत त्यांच्या सरकारने ४० टन अमली पदार्थ जप्त केले. तसेच १० हजारांहून अधिक गुन्हेगारांना अटक केली, असे शिनबाम यांनी सांगितले.

चीन जागतिक व्यापार संघटनेत दाद मागणार

अमेरिकेने आयात शुल्कात वाढ केल्याचा चीन, कॅनडा, मेक्सिकोतून विरोध होत आहे. १० टक्के आयात शुल्क लावल्याने चीनही संतापला असून, त्याने जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेचे एकतर्फी अतिरिक्त शुल्क आकारणे हे जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आहे. या पावलामुळे अमेरिकेला आपल्या समस्या सोडवता येण्यास अपयश येईल. तसेच दोन्ही देशांतील आर्थिक व व्यापारी सहकार्याला बाधा पोहचणार आहे, असे चीनने ठणकावले.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल