संग्रहित छायाचित्र  
आंतरराष्ट्रीय

विकसनशील देशांतील निर्वासितांना प्रवेश देणार नाही - ट्रम्प; १९ देश रडारवर

अमेरिकेला पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी विकसनशील देशांमधून येणाऱ्या निर्वासितांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात येणार असून देशाच्या सुरक्षेला धोका असलेल्या परदेशी नागरिकांना परत पाठविण्यात येईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.

Swapnil S

न्यू यॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकेला पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी विकसनशील देशांमधून येणाऱ्या निर्वासितांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात येणार असून देशाच्या सुरक्षेला धोका असलेल्या परदेशी नागरिकांना परत पाठविण्यात येईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.

वॉशिंग्टन डीसीमध्ये २ नॅशनल गार्ड्सच्या मृत्यूनंतर ट्रम्प यांनी गुरुवारी ही घोषणा केली. त्यांनी या हल्ल्याचा संबंध निर्वासितांशी जोडला. ट्रम्प म्हणाले की, इमिग्रेशन पॉलिसीमुळे देशातील लोकांचे जीवन वाईट झाले आहे.

ट्रम्प यांनी तिसऱ्या जगातील देशांतील निर्वासितांना देशात प्रवेश बंद करण्याची घोषणा यूएससीआयएस पेक्षाही मोठी आहे. ही एजन्सी अमेरिकेतील स्थलांतरितांशी संबंधित कामे पाहते. यूएससीआयएस आता अफगाणिस्तानसह १९ देशांतील अशा लोकांची चौकशी करणार आहे ज्यांना यापूर्वी अमेरिकेत कायमस्वरूपी नागरिकत्व (ग्रीन कार्ड) मिळाले आहे.

या १९ देशांची यादी ट्रम्प यांच्या जून २०२५ च्या एका आदेशात जारी करण्यात आली होती, ज्यात त्यांना 'चिंतेचे देश' असे म्हटले होते. ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे २७नोव्हेंबरपासून लागू झाली असून ती सर्व जुन्या आणि नवीन अर्जाना लागू होतील. या अंतर्गत, या देशांतून येणाऱ्यांना जारी केलेल्या प्रत्येक ग्रीन कार्डची कठोरपणे पुन्हा तपासणी केली जाणार आहे.

आता कोणत्याही गैर-नागरिकाला (नॉन-सिटिजन) कोणतीही सरकारी सुविधा, अनुदान किंवा लाभ दिला जाणार नाही. जे स्थलांतरित देशाची शांतता भंग करतील, त्यांची नागरिकता देखील काढून घेतली जाईल. ट्रम्प म्हणाले की, जे लोक सार्वजनिक ओझे आहेत, सुरक्षेसाठी धोका आहेत किंवा पाश्चात्त्य संस्कृतीशी जुळवून घेत नाहीत, त्यांनाही देशातून बाहेर काढले जाईल.

ट्रम्प यांचे म्हणणे आहे की या उपायांमुळे अवैध आणि समस्या निर्माण करणाऱ्या लोकसंख्येला कमी केले जाईल. त्यांनी असाही दावा केला की दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेत अशा सामाजिक समस्या नव्हत्या, पण आता चुकीच्या स्थलांतर धोरणांमुळे गुन्हेगारी आणि अव्यवस्था वाढली आहे.

Mumbai : रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

निसर्गरम्य, पर्यटनप्रेमी माथेरान झालं १७६ वर्षांचं; सह्याद्रीच्या कुशीतील चिमुकले गाव पर्यटकांचे बनले आवडते

Thane : दिव्याला मिळाला ४००६११ हा स्वतंत्र पिनकोड; दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण

Mumbai : लाइफ गार्ड ३ ते ४ किमीचा एरिया कव्हर करणार; चौपाट्यांवर १२६ लाइफ गार्ड, अतिरिक्त आयुक्तांची स्थायी समितीत माहिती

ठाण्यातील सर्व मार्केटचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा