वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि रशियानंतर आपला मोर्चा आता कॅनडाकडे वळवला आहे. कॅनडाबरोबरच्या सर्व व्यापाराच्या वाटाघाटी अचानक स्थगित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून त्यांच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे.
ट्रम्प हे गेल्या काही महिन्यांपासून अनेक मोठे निर्णय घेत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक देशांवर टॅरिफ लादले आहे. त्यानंतर आता युक्रेनमध्ये शांतता करार केल्यानंतर ट्रम्प नवीन हालचाली करत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून रशियावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर आर्थिक निर्बंध लादले आहेत.
अमेरिकेच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर रशियाच्या ऊर्जा व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या घडामोडी सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाबरोबरच्या सर्व व्यापाराच्या वाटाघाटी अचानक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी गुरुवारी घोषणा केली की, ते कॅनडाबरोबरच्या सर्व व्यापार वाटाघाटी स्थगित करत आहेत.