तुलसी गॅबार्ड 
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तान अण्वस्त्र क्षेपणास्त्र बनविण्याच्या तयारीत– गॅबार्ड

आगामी काळात जगात धोकादायक क्षेपणास्त्रांची संख्या खूप वेगाने वाढू शकते, पाकिस्तान अण्वस्त्र क्षेपणास्त्र बनविण्याच्या तयारीत आहे, पाकिस्तान अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करत आहे जी भविष्यात अमेरिकेवर हल्ला करू शकतात, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनी दिला आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : आगामी काळात जगात धोकादायक क्षेपणास्त्रांची संख्या खूप वेगाने वाढू शकते, पाकिस्तान अण्वस्त्र क्षेपणास्त्र बनविण्याच्या तयारीत आहे, पाकिस्तान अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करत आहे जी भविष्यात अमेरिकेवर हल्ला करू शकतात, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनी दिला आहे.

इराण, रशिया, चीन, उत्तर कोरिया अमेरिकेला टप्प्यात आणू शकतील, अशी अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असणारे क्षेपणास्त्र पाकिस्तान विकसित करत असल्याची माहिती तुलसी गबार्ड यांचा अमेरिकेच्या सभागृह समितीसमोर जबाबमध्ये दिली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अंदाजानुसार रशिया, चीन, उत्तर कोरिया, इराण आणि पाकिस्तान हे अण्वस्त्र आणि पारंपरिक स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पारंपरिक क्षेपणास्त्र प्रक्षेपण प्रणालींवर संशोधन आणि विकास करत आहेत, ज्यामुळे अमेरिका त्यांच्या टप्प्यात येऊ शकते, असेही त्या म्हणाल्या. अनेक नवीन, प्रगत आणि

संख्या १६ हजार पार

इंटेलिजन्स कम्युनिटीचा (आयसी) अंदाज आहे की, सध्या सुमारे ३,००० क्षेपणास्त्रे अशी आहेत जी अमेरिकेवर हल्ला करू शकतात, परंतु २०३५ पर्यंत ही संख्या १६,००० पेक्षा जास्त होऊ शकते. रशिया, चीन, उत्तर कोरिया, इराण आणि पाकिस्तानसारखे देश नवीन क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि शस्त्रे विकसित करत आहेत, असेही गॅबार्ड यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान अशी आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करू शकतो, जी खूप दूरपर्यंत मारा करू शकतात. तर इराणही २०३५ पूर्वी असे क्षेपणास्त्र विकसित करू शकतो. रशिया आणि चीन अमेरिकेची क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली भेदू शकतात, असेही त्या म्हणाल्या.

अणुयुद्धाचा धोका कायम

बुधवारी अमेरिकन सिनेटमध्ये सादर करण्यात आलेल्या अमेरिकन गुप्तचर समुदायाच्या 'वार्षिक धोका मूल्यांकन' अहवालानुसार, भारत आणि पाकिस्तानच्या संबंधात अणुयुद्धाचा धोका कायम आहे. ३४ पानांच्या या अहवालानुसार, जरी भारत आणि पाकिस्तान उघडपणे युद्ध इच्छित नसले तरी, अशी स्थिती आहे की ज्यात दहशतवादी घटक सतत संकट निर्माण करणारी परिस्थिती निर्माण करू शकतात.

नवी मुंबई विमानतळावरून FLY91ने घेतली भरारी! 'या' ४ ठिकाणी थेट विमानसेवा; पहिल्या फ्लाइटचं खास स्वागत, VIDEO

Thane : भविष्यात ठाण्यात पाणी टंचाईचे सावट गडद; ३१ एमएलडीची तूट

Mumbai : बेस्ट, रेल्वे, MMRDA पालिकेचे थकबाकीदार; पाण्याच्या बिलापोटी चार हजार कोटी थकवले

भटक्या श्वानांना आता कायमस्वरूपी निवारा; निर्बीजीकरणानंतर भटक्या कुत्र्यांचे ठिकाण बदलणार, प्रती श्वान १५५ रुपये खर्च करणार

'ऑक्टोबर हिट'चा सिंधुदुर्गाला तडाखा; वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण; तापमान ३४ ते ३६ अंश दरम्यान