Iran vs US-Israel War : ऐन युद्धात सेनापती ‘घरी’; अमेरिकेत खळबळ 
आंतरराष्ट्रीय

Iran vs US-Israel War : ऐन युद्धात सेनापती ‘घरी’; अमेरिकेत खळबळ

इराणशी युद्ध निकराला आलेले असतानाच अमेरिकी सैन्याचे चीफ ऑफ स्टाफ रँडी जॉर्ज यांना तत्काळ पद सोडून निवृत्त होण्याचा आदेश संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी दिल्याने अमेरिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : इराणशी युद्ध निकराला आलेले असतानाच अमेरिकी सैन्याचे चीफ ऑफ स्टाफ रँडी जॉर्ज यांना तत्काळ पद सोडून निवृत्त होण्याचा आदेश संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी दिल्याने अमेरिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

पेंटागॉनने या आदेशाची पुष्टी केली असून संरक्षण मंत्र्यांनी सैन्याच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला पद सोडण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले आहे. मात्र, या निर्णयामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अहवालानुसार काश पटेल, डॅनियल ड्रिस्कॉल आणि लोरी शावेज-डेरेमर यांसारख्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पदावरून हटवण्याबाबत चर्चा सुरू आहे. तथापि, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही.

काश पटेल यांच्यावर आरोप

लष्करप्रमुखांना पदावरून हटविल्यानंतर आता एफबीआय प्रमुख काश पटेल आणि नॅशनल इंटेलिजन्स प्रमुख तुलसी गबार्ड हे ट्रम्प यांच्या रडारवर असून त्यांची लवकरच हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय वंशाचे आणि ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे काश पटेल यांनी यांनी वैयक्तिक कामांसाठी, जसे की खेळ बघायला जाण्यासाठी, एफबीआयच्या सरकारी जेटचा वापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांनी आपली मैत्रीण ॲलेक्सिस विल्किन्स हिला कमांडोची सुरक्षा पुरवण्यासाठी सरकारी संसाधनांचा चुकीचा वापर केल्याचा आरोप आहे.

ट्रम्प-गॅबार्ड मतभेद

तुलसी गबार्ड यांच्या भूमिकेवरही ट्रम्प नाराज असल्याचे समजते. इराण युद्धावरून गबार्ड आणि ट्रम्प यांच्यात मतभेद उघड झाले आहेत. ट्रम्प यांनी इराणच्या युरेनियम क्षमतेवर हल्ल्याचे समर्थन केले असताना, गबार्ड यांनी सिनेटमध्ये सांगितले की, इराणने आपली अण्वस्त्र क्षमता पुन्हा विकसित केलेली नाही. ट्रम्प यांच्या इराण युद्धाच्या निषेधार्थ राजीनामा देणारे अधिकारी जो केंट यांची गबार्ड यांनी पाठराखण केली, जे ट्रम्प यांना रुचलेले नाही. यामुळे ट्रम्प यांनी खासगीत गबार्ड यांना बदलण्याबाबत वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तुलसी गबार्ड यांचीही गच्छंती होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Navi Mumbai : भाज्यांची दरवाढ; उन्हाचा तडाखा, इंधन दरवाढीचा फटका

जिल्हा बँकांना ‘सायबर सिक्युरिटी’ बंधनकारक; सहकार विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांचे आदेश

Pune : माऊलींच्या मंदिराची सुरक्षा AI कडे; मंदिर संस्थान कमिटीची घोषणा

नाशिक टीसीएस प्रकरण : मतीन पटेलसह घरमालकाची चौकशी; SIT कडून मोबाईल जप्त, गरज पडल्यास पुन्हा चौकशी

जळगावची जागा द्या, अन्यथा मैत्रीपूर्ण लढू द्या; गुलाबराव पाटलांच्या पुत्रासाठी शिंदे गट आक्रमक