आंतरराष्ट्रीय

इराणच्या नागरी अणू कार्यक्रमाला अमेरिकेचे २.५ लाख कोटी, ट्रम्प प्रशासनाच्या सूत्रांची माहिती

इराण-इस्रायल युद्धविरामानंतर इराणबाबत अमेरिकेची भूमिका मवाळ झाली आहे. इराणच्या नागरी अणू प्रकल्पांसाठी २.५ लाख कोटी देण्याचा प्रस्ताव अमेरिकेने तयार केला असून इराणवरील निर्बंध मागे घेण्याची तयारीही अमेरिकेने दर्शवली आहे. तसेच इराणचे परदेशी बँकेतील ६ अब्ज डॉलरही त्यांना मिळू शकतात.

Swapnil S

वॉशिंग्टन : इराण-इस्रायल युद्धविरामानंतर इराणबाबत अमेरिकेची भूमिका मवाळ झाली आहे. इराणच्या नागरी अणू प्रकल्पांसाठी २.५ लाख कोटी देण्याचा प्रस्ताव अमेरिकेने तयार केला असून इराणवरील निर्बंध मागे घेण्याची तयारीही अमेरिकेने दर्शवली आहे. तसेच इराणचे परदेशी बँकेतील ६ अब्ज डॉलरही त्यांना मिळू शकतात.

अमेरिका-इराण यांच्यात शांतता चर्चा सुरू होण्याचे प्रयत्न दिसत आहेत. २० जून रोजी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकन दूत स्टीव्ह विटकॉफ व आखाती देशांमध्ये गुप्त बैठक झाली. याबाबत या प्रस्तावावर चर्चा झाली. ट्रम्प प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले की, अमेरिका थेट इराणला निधी देणार नाही.

खामेनी यांना ठार करण्याची संधी मिळाली नाही

आम्हाला शक्य झाले असते तर आम्ही खामेनी यांना ठार केले असते. आम्ही खामेनी यांना ठार करण्याचे पूर्ण प्रयत्न केले. इस्रायलने खामेनी यांना ठार करायला अमेरिकेची परवानगी मागितली का? त्यावर ते म्हणाले की, आम्हाला यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही.

अणू चर्चेची तयारी नाही- अघराची

तुम्ही आमच्या अणू केंद्रावर ३० हजार पौंडचा बॉम्ब टाकून मोठी चूक केली आहे. अमेरिकेने केलेल्या कृतीमुळे अणू केंद्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अमेरिकेशी पुन्हा चर्चा करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अघराची यांनी सांगितले.

ठाकरेंना मागच्या रांगेत बसवल्यावरून खडाखडी

प्राप्तिकर विधेयक सरकारकडून मागे

...तोपर्यंत व्यापार चर्चा नाही! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा इशारा

मोदींच्या दौऱ्याचे चीनकडून स्वागत

तेल कंपन्यांना अनुदान, ‘टॅरिफ बॉम्ब’च्या पार्श्वभूमीवर ३० हजार कोटींची मदत; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय