एक्स @AjayBajrangYadv
आंतरराष्ट्रीय

कॅनडात कारने जमावाला चिरडले; ९ जणांचा मृत्यू

कॅनडाच्या व्हॅंकुव्हर येथे स्ट्रिट फेस्टिव्हलदरम्यान एका भरधाव कारने जमावाला चिरडले, या अपघातात ९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Swapnil S

व्हँकूव्हर : कॅनडाच्या व्हॅंकुव्हर येथे स्ट्रिट फेस्टिव्हलदरम्यान एका भरधाव कारने जमावाला चिरडले, या अपघातात ९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

शनिवारी रात्री ८ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी सकाळी ८.३० वा.) ई-४३व्या अॅव्हेन्यू आणि फ्रेझर येथे एका स्ट्रिट फेस्टिव्हलमध्ये लोकांची तोबा गर्दी जमली होती. या गर्दीत कार घुसल्याने, अनेकांना जागीच प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, व्हँकूव्हरचे महापौर केन सिम यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत सांगितले की, “फिलिपिनो वारसा आणि संस्कृतीचा उत्सव साजरा करणाऱ्या ‘लापू लापू लापू डे फेस्टिव्हल’मध्ये घडलेल्या या घटनेबद्दल दु:ख झाले.” तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेमागील हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. परंतु हा हल्ला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच अलीकडच्या काही काळात कॅनडामध्ये अशा अनेक प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. या अत्यंत कठीण काळात आमच्या संवेदना व्हँकूव्हरमधील सर्व प्रभावित लोकांसोबत आणि फिलिपिनो समुदायासोबत आहेत.”

भारतातील ऑटो कंपोनंट उद्योग १० टक्के वेगाने वाढणार; देशांतर्गत मागणी, वाढत्या निर्यातीमुळे चालू आर्थिक वर्षात क्षेत्र वाढण्याची उद्योगाला अपेक्षा

वारीसाठी पुणे पोलिसांची 'हायटेक' सुरक्षा व्यवस्था; एआय, ड्रोन, चेहरा ओळखणारी यंत्रणा, जीपीएस, सीसीटीव्हीसह आठ हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा

जलमय वसईत नागरिकांना ट्रॅक्टरचा आधार; चालकांकडून माफक दरात प्रवाशांची वाहतूक

West Bengal : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर; पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पळून जात होता

वसई-विरारदरम्यान रुळांवर पाणी; पश्चिम रेल्वेच्या लोकल ३० मिनिटे उशिराने