व्हेनेझुएलात भूकंप; १६४ जण ठार (Photo-X)
आंतरराष्ट्रीय

व्हेनेझुएलात भूकंप; १६४ जण ठार

व्हेनेझुएलात बुधवारी दोन शक्तिशाली भूकंपात १६४ जणांचा मृत्यू झाला असून १ हजार जण जखमी झाले आहेत.

Swapnil S

कॅराकॅस : व्हेनेझुएलात बुधवारी दोन शक्तिशाली भूकंपात १६४ जणांचा मृत्यू झाला असून १ हजार जण जखमी झाले आहेत. या भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसलेल्या भागात बचाव पथकांनी जोरदार कार्य सुरू केले आहे. या दुर्घटनेत शेकडो लोक इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

व्हेनेझुएलात बुधवारी संध्याकाळी ७.२ आणि ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के बसले. हे भूकंप गेल्या शतकातील सर्वात शक्तिशाली भूकंप मानले जात आहेत. याचे धक्के संपूर्ण प्रदेशात जाणवले.

कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेलसी रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, सरकार देशाच्या इतर भागांतून बचाव पथके भूकंपाचा सर्वात मोठा फटका बसलेल्या ‘ला गुएरा’ येथे हलवत आहे.

रहिवाशांनी सांगितले की, त्यांना इमारती कोसळण्याची भीती वाटत होती. शहराच्या मध्यवर्ती भागात शेकडो लोकांनी पार्क आणि रिकाम्या जागी उघड्यावर रात्र काढली. अनेक ठिकाणी वीजपुरवठा आणि मोबाईल सेवा खंडित झाली होती. शिक्षण मंत्रालयाने काही दिवसांसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, शाळांच्या इमारतींचा वापर आश्रयस्थान म्हणून केला जाणार आहे.

या संकटकाळात अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी सांगितले की, अमेरिका तातडीने शोध आणि बचाव पथके, वैद्यकीय संसाधने आणि मानवतावादी मदत व्हेनेझुएलाला पाठवत आहे. याव्यतिरिक्त इक्वेडोर, कतार, मेक्सिको आणि अल साल्वाडोर या देशांनीही मदत आणि बचाव पथके पाठवली आहेत. कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष रॉड्रिग्ज यांनी देशाला संबोधित करताना २०० दशलक्ष डॉलर्सचा पुनर्बांधणी निधी जाहीर केला आहे. तसेच, त्यांनी सर्व मदत करणाऱ्या देशांचे आभार मानले आहेत.

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

जीएसटी २ लाख कोटी; सप्टेंबरमध्ये अप्रत्यक्ष कर संकलन १५ टक्क्यांनी वाढले

उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांचा आज ‘नो यूपीआय डे’; डिजिटल पेमेंटला एक दिवसाचा ‘ब्रेक’; स्कॅनरवर काळे कापड टाकून निषेध

गस्तीवरच्या 'पोलीस दीदी'ने थप्पड लगावल्याचा राग, तरुणाने वर्दीवर उचलला हात; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, VIDEO

दिवाळीत म्हाडा कोकणची सोडत शक्य; २,५०० घरांचा समावेश