व्हिएतनाम बोट दुर्घटनेप्रकरणी कॅप्टनला अटक X / @holinh87
आंतरराष्ट्रीय

व्हिएतनाम बोट दुर्घटनेप्रकरणी कॅप्टनला अटक

व्हिएतनामच्या फु क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांची स्पीडबोट उलटून झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी कॅप्टन गुयेन होंग हाई याला अटक केली आहे. या प्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे. खराब हवामानामुळे ही घटना घडली की सागरी सुरक्षा नियमात त्रुटी राहिल्या आदींचा शोध घेतला जात आहे.

Swapnil S

हो चि मिन्ह : व्हिएतनामच्या फु क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांची स्पीडबोट उलटून झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी कॅप्टन गुयेन होंग हाई याला अटक केली आहे. या प्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे. खराब हवामानामुळे ही घटना घडली की सागरी सुरक्षा नियमात त्रुटी राहिल्या आदींचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी बोटीची कागदपत्रे, तांत्रिक तपशील व अन्य पुरावे जप्त केले आहेत. चालक व अन्य सदस्यांची चौकशी केली आहे. प्रवासाच्या काळात हवामानाचा इशारा, सुरक्षा नियम व संचालनाबाबतच्या नियमांचे पालन झाले की नाही याचा तपास केला जात आहे.

१५ भारतीय नागरिकांचे पार्थिव मायदेशी आणण्याची तयारी सुरू

बोट दुर्घटनेतील मृत १५ भारतीय नागरिकांचे पार्थिव हो चि मिन्ह सिटी येथे पोहोचले असल्याचे रविवारी व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने सांगितले. आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतांचे पार्थिव भारतात पाठवले जाईल.

दूतावासाने सांगितले की, दुर्दैवी नौका दुर्घटनेतून वाचलेल्या १५ नागरिकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते भारतात परतत आहेत. अतिदक्षता विभागात असलेल्या दोन रुग्णांपैकी एकाला डिस्चार्ज देण्यात आला असून तो भारतात परतत आहे. दुसरा रुग्ण फु क्वोक येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महागाई भडकली! घाऊक महागाईचा दर ९.९२ टक्क्यांवर; किरकोळ महागाई ४.८२ टक्क्यांवर, अन्न, इंधन आणि उत्पादित वस्तू महागल्या

राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात UCC विधेयक मांडण्याच्या तयारीत - देवेंद्र फडणवीस

Maratha Reservation : मनोज जरांगेंची आज मुंबईकडे कूच; आझाद मैदानावर एकटेच उपोषण करणार

संस्कृती आणि भाषांच्या संवर्धनातूनच ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ मजबूत होईल; अखिल भारतीय राजभाषा संमेलनात अमित शहा यांचे प्रतिपादन

‘एस-४००’ ने ३१४ किमीवरील पाकिस्तानी विमान पाडले; संरक्षण खात्याच्या ताज्या अहवालात उघड