आंतरराष्ट्रीय

झेलेन्स्की ३० दिवसांच्या युद्धबंदीसाठी तयार; आता रशियाच्या संमतीची प्रतीक्षा

युक्रेन युद्ध संपवण्यासाठी अमेरिकन आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाल्यानंतर युक्रेनने अमेरिकेचा ३० दिवसांचा युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारला आहे.

Swapnil S

जेद्दाह : युक्रेन युद्ध संपवण्यासाठी अमेरिकन आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाल्यानंतर युक्रेनने अमेरिकेचा ३० दिवसांचा युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी याबाबत पुष्टी केली. आता या प्रस्तावाला रशियाच्या संमतीची प्रतीक्षा आहे.

‘हा प्रस्ताव एक सकारात्मक पाऊल आहे. युक्रेन हे स्वीकारण्यास पूर्णपणे तयार आहे. आता यासाठी रशियाला पटवून देण्याची जबाबदारी अमेरिकेची आहे. मॉस्को सहमत होताच, युद्धबंदी ताबडतोब लागू होईल’, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्झ यांनी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या बैठकीत युक्रेनकडून आलेल्या अनेक तडजोडीच्या प्रस्तावांवर चर्चा केली. तथापि, युक्रेनियन अधिकारी व्यापलेल्या क्षेत्राच्या मुद्द्यावर कोणत्याही तडजोडीसाठी तयार दिसत नव्हते. रशियाने आधीच युक्रेनचा २०% भाग ताब्यात घेतला आहे.

अमेरिकेने युक्रेनची लष्करी मदत पूर्ववत केली

दरम्यान, युक्रेनने युद्धबंदीची तयारी दर्शवताच ट्रम्प प्रशासनाने युक्रेनला करण्यात येणारी लष्करी मदत व गुप्त माहितीच्या देवाणघेवाणीवरील बंदी उठवली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झेलेन्स्की यांचा वाद झाल्यानंतर अमेरिकेने युक्रेनची लष्करी मदत थांबवली होती.

रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला

अमेरिकेने युक्रेनची थांबवलेली लष्करी मदत सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला केला, त्यात ५ नागरिक ठार झाले.

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

केंद्राकडून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना १,५६६ कोटींची मदत; कर्नाटकलाही ३८४ कोटींचा निधी जाहीर

'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन

गृह मंत्रालयाशी चर्चा करायला लडाखचे शिष्टमंडळ तयार; येत्या बुधवारी दिल्लीत बैठकीचे आयोजन

महाराष्ट्रात ९६ लाख बोगस मतदार; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल