आंतरराष्ट्रीय

Walkie-Talkies Explode: लेबॅनॉनमध्ये वॉकीटॉकी, पेजर, स्फोटांत २१ ठार; ३ हजारांहून अधिक जखमी

लेबॅनॉन व सीरियामध्ये वॉकीटॉकी व पेजर स्फोटांच्या मालिकेत आतापर्यंत २१ जण ठार झाले असून, ३ हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत.

Swapnil S

बैरुत : लेबॅनॉन व सीरियामध्ये वॉकीटॉकी व पेजर स्फोटांच्या मालिकेत आतापर्यंत २१ जण ठार झाले असून, ३ हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. हे स्फोट इस्रायलने घडवून आणल्याचा संशय आहे. लेबनॉन आणि सीरियाच्या काही भागांमध्ये मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास एकाचवेळी अनेक पेजरमध्ये स्फोट झाले. या पेजरचा वापर हिजबुल्लाचे सदस्य मेसेज पाठवण्यासाठी करायचे.

या स्फोटांमागे इस्रायल आणि त्यांची गुप्तहेर यंत्रणा मोसाद असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे पेजर तैवानी कंपनीने बनवले असून त्याची निर्मिती युरोपमध्ये करण्यात आली होती. इस्रायल पेजरच्या माध्यमातून काहीतरी कारवाई करणार असल्याचा सुगावा हिजबुल्लाला लागलेला होता. त्यामुळे इस्रायलने घाईघाईने हे पेजर स्फोट घडवून आणले, असे म्हटले जात आहे. या कारवाईने जगभरात खळबळ माजली आहे.

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

शक्तीपीठ महामार्ग जमीन संपादनातून कोल्हापूर वगळले; शेतकऱ्यांच्या विरोधानंतर महायुतीचा निर्णय

नृशंस हत्यांचा कळस अन् बेदरकार नेतन्याहू

भाषा मरता देशही मरतो...

आजचे राशिभविष्य, २९ ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत