Freepik
लाईफस्टाईल

रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्यासाठी आयुर्वेदानुसार 'ही' आहेत चार महत्त्वाची कारणे, जाणून घ्या वाढविण्यासाठीचे उपाय

मानवाला विविध आजारांसाठी सामना करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती ही अंतर्गतच विकसित झालेली असते. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. परिणामी आजारांशी लढा देण्याची शक्ती कमी होते आणि आपण वारंवार आजारी पडतो. कोविडच्या काळापासून लोक मुख्यत्वे करून रोगप्रतिकारकशक्ती बाबत जागरूक होत आहेत.

Kkhushi Niramish

मानवाला विविध आजारांसाठी सामना करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती ही अंतर्गतच विकसित झालेली असते. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. परिणामी आजारांशी लढा देण्याची शक्ती कमी होते आणि आपण वारंवार आजारी पडतो. कोविडच्या काळापासून लोक मुख्यत्वे करून रोगप्रतिकारकशक्ती बाबत जागरूक होत आहेत. चला जाणून घेऊया आयुर्वेदानुसार रोगप्रतिकारकशक्ती कमकुवात होण्याची कारणे आणि काय आहेत उपाय...

आयुर्वेदानुसार रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होण्याची चार मुख्य कारणे

चुकीचा आहार

आयुर्वेदानुसार रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याच्या चार मुख्य कारणांपैकी चुकीचा आहार हे एक कारण आहे. आजकालच्या धावपळीच्या जगात आपण सातत्याने जंक फूड, फास्ट फूड खातो. परिणामी जास्त तळलेले चमचमीत पदार्थ, थंड तसेच शिळे अन्न वारंवार पोटात गेल्याने शरीरात विषारी द्रव्य तयार होतात. परिणामी रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.

अग्नि कमकुवत होणे

आयुर्वेदानुसार शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आणि अन्नाचे व्यवस्थित पाचन होण्यासाठी अग्नि हा खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. आपल्या शरीरात अन्नखाल्ल्यानंतर जठराग्नि पेटतो. हा जठराग्नि अन्नाचे पाचन करतो. मात्र, हा जठराग्नि खराब झाल्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, गॅस होणे असे प्रकार होतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

त्रिदोषाचे असंतुलन

आयुर्वेदानुसार शरीरात वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष मानले गेले आहे. शरीरात या तिघांचे प्रमाण योग्य असायला हवे. या त्रिदोषांच्या असंतुलनामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

मानसिक ताण

आयुर्वेदानुसार मानसिक ताण हा देखील शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्यासाठी कारणीभूत आहे. चिंता, राग, भीती, नैराश्य यांमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.

काय आहेत उपाय?

योग्य आहार घेणे

रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यासाठी योग्य तो आहार घेणे महत्त्वाचे आहे. जास्तीत जास्त भाज्या, फळभाज्यांचा आहार घेणे महत्त्वाचे आहे. सोबतच ताजे अन्न खाण्याला आयुर्वेद महत्त्व देते. शक्यतो फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न खाणे टाळावे.

योग आणि व्यायाम

योग आणि व्यायाम केल्यामुळे मानसिक आजार जसे की, चिंता, भीती, राग यांसारख्या तक्रारी दूर होतात. परिणामी मन स्थिर राहते. त्यामुळे देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; २९ ते ३१ जुलैदरम्यान जोर वाढण्याची शक्यता

कामगिरी सुधारा, अन्यथा बाजूला व्हा! निष्क्रिय मंत्र्यांना एकनाथ शिंदेंचा इशारा

व्हिडीओचा नव्हे, 'दिल का अँगल' बदला; प्रियांकांचा मोदींना खोचक सल्ला, परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा

कठोर कारवाई नको! दिल्ली आंदोलनप्रकरणी 'सर्वोच्च' दिलासा; १८ वर्षांखालील मुलांची तत्काळ सुटका करण्याचे निर्देश

Nashik : शालार्थ आयडी घोटाळा; संजय गरुड याला अटक