TRAI च्या आदेशानंतर एअरटेलचे कॉलिंगसाठी ३ नवे प्लॅन; किंमत १८५ पासून सुरू, बघा डिटेल  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

TRAI च्या आदेशानंतर एअरटेलचे कॉलिंगसाठी ३ नवे प्लॅन; किंमत १८५ पासून सुरू, बघा डिटेल

Airtel Voice Only Plans : एअरटेलचे १८५, २०३ आणि २०६ रुपयांचे नवे कॉलिंग प्लॅन! इंटरनेट डेटाशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, ३०० एसएमएस आणि हॅलो ट्यूनची सुविधा. जाणून घ्या किंमत, वैधता आणि फायदे.

Mayuri Gawade

दूरसंचार क्षेत्रातील एअरटेल कंपनीने केवळ कॉलिंग आणि एसएमएससाठी तीन नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) निर्देशांनुसार हे प्लॅन आणण्यात आले आहेत. या प्लॅनची किंमत १८५ रुपयांपासून सुरू होते, यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, ३०० एसएमएस आणि मोफत हॅलोट्यून्सचा लाभ मिळतो. विशेष म्हणजे, या तिन्ही प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा मिळणार नाही. त्यामुळे ज्यांना इंटरनेटची गरज नाही आणि फक्त कॉलिंगसाठी रिचार्ज करायचा आहे, त्यांच्यासाठी हे प्लॅन उपयोगी ठरू शकतात.

एअरटेलचा १८५ रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या १८५ रुपयांच्या प्लॅनची वैधता २८ दिवस आहे. यामध्ये ग्राहकांना स्थानिक, एसटीडी आणि रोमिंगसह अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. तसेच, संपूर्ण वैधतेदरम्यान ३०० एसएमएस मोफत मिळतात. याशिवाय, मोफत हॅलोट्यून्सची सुविधाही दिली जाते. मात्र, या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा मिळत नाही.

- किंमत : १८५ रुपये

- वैधता : २८ दिवस

- कॉलिंग : अनलिमिटेड

- एसएमएस : ३००

- इतर लाभ : मोफत हॅलोट्यून्स

- डेटा : उपलब्ध नाही

एअरटेलचा २०३ रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या २०३ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३० दिवसांची वैधता मिळते. यामध्येही स्थानिक, एसटीडी आणि रोमिंगसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. ग्राहकांना ३०० एसएमएस आणि मोफत हॅलोट्यून्सचा लाभ मिळतो. या प्लॅनमध्येही इंटरनेट डेटा दिला जात नाही.

- किंमत : २०३ रुपये

- वैधता : ३० दिवस

- कॉलिंग : अनलिमिटेड

- एसएमएस : ३००

- इतर लाभ : मोफत हॅलोट्यून्स

- डेटा : उपलब्ध नाही

एअरटेलचा २०६ रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या २०६ रुपयांच्या प्लॅनमध्ये कॅलेंडर महिन्यानुसार वैधता मिळते. म्हणजेच, ज्या तारखेला रिचार्ज केला असेल, त्यानुसार पुढील महिन्यात त्याच तारखेला प्लॅनची वैधता संपते. त्यामुळे महिन्यातील दिवसांनुसार वैधता बदलू शकते. उदाहरणार्थ, ३१ दिवसांच्या महिन्यात ३१ दिवस, तर फेब्रुवारीमध्ये २८ दिवसांची वैधता मिळू शकते.

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड स्थानिक, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंगसह ३०० एसएमएस आणि मोफत हॅलोट्यून्स मिळतात. मात्र, इंटरनेट डेटाची सुविधा यातही नाही.

- किंमत : २०६ रुपये

- वैधता : कॅलेंडर महिन्यानुसार

- कॉलिंग : अनलिमिटेड

- एसएमएस : ३००

- इतर लाभ : मोफत हॅलोट्यून्स

- डेटा : उपलब्ध नाही

कोणता प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर?

तुम्हाला केवळ कॉलिंगसाठी रिचार्ज करायचा असेल, तर वैधतेनुसार या तीन प्लॅनची निवड करता येईल. २८ दिवसांसाठी १८५ रुपयांचा प्लॅन, ३० दिवसांसाठी २०३ रुपयांचा प्लॅन, तर कॅलेंडर महिन्यानुसार वैधतेसाठी २०६ रुपयांचा प्लॅन निवडता येईल. मात्र, दररोज इंटरनेट वापरण्याची गरज असल्यास स्वतंत्र डेटा पॅक घ्यावा लागेल.

कोणाला होणार फायदा?

घरात किंवा ऑफिसमध्ये वाय-फाय वापरणारे नोकरदार, कॉलेजचे विद्यार्थी, इंटरनेटचा वापर कमी करणारे ज्येष्ठ नागरिक, कीपॅड फोन वापरणारे ग्राहक आणि दोन सिमकार्ड वापरणाऱ्या व्यक्तींसाठी एअरटेलचे हे प्लॅन फायदेशीर ठरू शकतात. ज्यांना मुख्यतः फोनवर बोलण्यासाठी रिचार्ज करायचा आहे आणि मोबाइल डेटाची गरज नाही, त्यांना या प्लॅनमुळे अनावश्यक डेटा बेनिफिट्ससाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत. प्रवासात इंटरनेटची गरज भासल्यास स्वतंत्र डेटा पॅक घेण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.

महत्त्वाचे : रिचार्ज करण्यापूर्वी एअरटेलच्या अधिकृत अ‍ॅप किंवा वेबसाइटवर प्लॅनची उपलब्धता आणि अटी तपासून घ्या.

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक; मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या कोटामधून घातल्या बेड्या

उल्हासनगरच्या वाहतूककोंडीवर उतारा? उड्डाणपुलाचा डीपीआर तयार

देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र वेंगुर्ल्यात

७२ पेक्षाही २०२६ चा दुष्काळ कठीण; सप्टेंबरमध्येच आटले जलस्रोत; यंदा पुनर्भरणच नाही

रत्नागिरीकरांना पावसाचा दिलासा! देवरुख परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी