Akshaya Tritiya 2024 Messages In Marathi: अक्षय्य तृतीयेचा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि संपत्तीची देवता कुबेर यांची पूजा केली जाते. विशेष पूजेशिवाय या सणाला सोने खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. यंदा अक्षय्य तृतीये आज म्हणजेच १० मे रोजी साजरी केली जात आहे. आपले सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. या खास दिनी आपण भेटू शकलो नाही तरी एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवतो. एवढंच नाही तर अनेकजण सोशल मीडियावरही शुभेच्छा संदेश स्टेटसला ठेवतात. जर तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा संदेश पाठवायचे असतील, तर आम्ही तुमच्यासाठी खास शुभेच्छा संदेश (messages, wishes, Facebook, WhatsApp Status, quotes) घेऊन आलो आहोत.
बघा शुभेच्छा संदेश
> अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी,
तुमच्या आयुष्यात अक्षय राहो सुख शांती,
अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!!!
> तुमच्या घरावर होवो धनाची बरसात…
लक्ष्मीचा असो वास…
संकटाचा होवो नाश…
शांतीचा असो वास…
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!
> लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो..
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
> आज अक्षय तृतीया,
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!!
आपल्या आयुष्यात 'अक्षय' सुख,
धनसंपदा, मैत्री आणि आरोग्य लाभो,
हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!!
माझ्या कडून तुम्हाला,
अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा!!
> तुमच्या घरात धनाचा पाऊस येवो,
लक्ष्मीचा सदैव वास राहो..
संकटांचा नाश होवो,
आणि शांतीचा वास राहो..
अक्षय्य तृतीयाच्या मनापासून शुभेच्छा!
> अक्षय राहो धनसंपदा,
अक्षय राहो शांती..
अक्षय राहो मनामनातील,
प्रेमळ निर्मळ नाती..
अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा..!
> आनंदाचे तोरण लागो दारी,
सुंदर रांगोळी अवतरे अंगणी,
सुखासमाधानाचा असो आजचा दिवस हीच सदिच्छा..
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)