फिटनेस टिकवण्यासाठी अनुष्काने सांगितल्या डाएटच्या ३ सवयी; अजिबातच खात नाही साखर, दूध आणि... वाचा सविस्तर  
लाईफस्टाईल

फिटनेस टिकवण्यासाठी अनुष्काने सांगितल्या डाएटच्या ३ सवयी; अजिबातच खात नाही साखर, दूध आणि... वाचा सविस्तर

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या फिटनेस आणि शिस्तबद्ध जीवनशैलीसाठीही ओळखली जाते. वजन नियंत्रणात ठेवणं, शुगर कंट्रोल आणि एकूणच आरोग्य चांगलं राहावं यासाठी आहारात काही गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात, असं तिचं ठाम मत आहे.

Mayuri Gawade

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या फिटनेस आणि शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी ओळखली जाते. वजन नियंत्रणात ठेवणं, शुगर कंट्रोल आणि एकूणच आरोग्य चांगलं राहावं यासाठी आहारात काही गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात, असं तिचं ठाम मत आहे. याबाबतची माहिती तिनं स्वतः एका मुलाखतीदरम्यान दिली आहे.

'the_food_balance' या इंस्टाग्राम पेजवर अनुष्का शर्माच्या एक जुन्या मुलाखतीचा एक छोटासा भाग शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का तिच्या रोजच्या डाएट सवयींबद्दल बोलताना दिसते. फिटनेस टिकवण्यासाठी तिनं कोणते पदार्थ पूर्णपणे टाळले आहेत, याचा स्पष्ट उल्लेख तिनं यामध्ये केला आहे.

गहू आणि मैद्याला पूर्णपणे रामराम

अनुष्का सांगते की ती गहू अजिबात खात नाही. ग्लुटेन फ्री डाएटवर तिचा भर असून गहू आणि गव्हाचे पदार्थ तिच्या आहारातून पूर्णपणे वगळले आहेत. गहूसोबतच मैदाही ती टाळते. गव्हाच्या पोळीऐवजी ती बाजरी, ज्वारी, राजगिरा आणि क्विनोआ यांच्या पिठाच्या भाकऱ्या खाते. या पर्यायांमुळे शरीराला जास्त फायबर आणि पोषणमूल्यं मिळतात, असं तिचं मत आहे.

साखर टाळल्यामुळे वजन आणि शुगर नियंत्रणात

फिटनेससाठी अनुष्कानं साखर पूर्णपणे बंद केली आहे. साखर आरोग्यासाठी किती घातक ठरू शकते, याची जाणीव असल्यामुळे ती कोणत्याही प्रकारची साखर घेत नाही. साखर टाळल्यामुळे वजन आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. शिवाय शरीरावरची सूज कमी होते आणि त्वचेवरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो, असं अनुष्का सांगते.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थही नाहीत

गहू आणि साखरेप्रमाणेच अनुष्का दूध आणि दुग्धजन्य पदार्थही खात नाही. ती वेगन डाएट फॉलो करते. त्यामुळे दूध, पनीर, चीज, बटर यांसारखे कोणतेही पदार्थ तिच्या आहारात नसतात. या डाएटमुळे शरीर हलकं राहातं आणि पचनक्रिया सुधारते, असं तिचं म्हणणं आहे.

फिटनेससाठी शिस्त आणि योग्य आहार महत्त्वाचा

अनुष्काच्या मते, फिटनेस टिकवायचा असेल तर केवळ व्यायाम नाही तर आहारात शिस्त असणं तितकंच गरजेचं आहे. काही पदार्थांपासून दूर राहिल्यास वजन, शुगर आणि एकूणच तब्येत नियंत्रणात ठेवणं सोपं होतं. तिच्या या डाएट सवयी आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

नानापर्व निमाले! मराठी, हिंदी नाट्य-चित्रपटसृष्टीचा अष्टपैलू अभिनेता नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड

विरोधकांचे सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन; ज्ञानेश कुमारांविरोधात राजघाटावर काँग्रेसचा ठिय्या

SIR Protest : विरोधकांना संपवण्यासाठीच एसआयआर - अभिजीत दिपके

नाना सर, मैत्री अन् आदराचा अत्यंत सुरक्षित सोबती - सोनाली कुलकर्णी

आणखी एका कंत्राटदाराची आत्महत्या; देयकाची रक्कम न मिळाल्याने उचलले टोकाचे पाऊल, आतापर्यंत ९ कंत्राटदारांनी केली आत्महत्या