लाईफस्टाईल

अनुष्का शर्माच्या न्यूट्रिशनिस्टने सांगितली, प्रेग्नन्सी डाएटमध्ये भारतीय महिलांकडून होणारी मोठी चूक

प्रेग्नन्सी काळातही अनुष्काने कोणत्याही फूड ट्रेंडच्या मागे न धावता, शास्त्रावर आधारित आणि पूर्णतः नियोजनबद्ध आहार स्वीकारला होता. तिच्या या प्रेग्नन्सी डाएटमागचं नेमकं गणित तिचे सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रयान फर्नांडो यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये उघड केलं आहे.

Mayuri Gawade

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या हेल्दी लाईफस्टाईलसाठीही ओळखली जाते. प्रेग्नन्सी काळातही अनुष्काने कोणत्याही फूड ट्रेंडच्या मागे न धावता, शास्त्रावर आधारित आणि पूर्णतः नियोजनबद्ध आहार स्वीकारला होता. तिच्या या प्रेग्नन्सी डाएटमागचं नेमकं गणित तिचे सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रयान फर्नांडो यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये उघड केलं आहे.

अनुष्कासाठी खास डिझाइन केलेला प्रेग्नन्सी डाएट

रयान फर्नांडो सांगतात की, अनुष्काची प्रेग्नन्सी डाएट त्यांनी स्वतः बनवला होता. या काळात “हवं ते खा” किंवा “दोन जीवांसाठी खा” असा सर्वसाधारण सल्ला दिला गेला नाही. उलट, आईचं वजन किती वाढायला हवं, शरीराला किती कॅलरी आवश्यक आहेत आणि त्या कॅलरीज कुठून मिळतात, याचं अचूक गणित मांडलं गेलं. कारण आईचं वजन वाढणं आणि बाळाची वाढ व विकास यांचा थेट संबंध असतो.

भारतीय महिलांमध्ये नेमकी चूक कुठे होते?

त्यांच्या मते, भारतात अनेक महिलांमध्ये प्रेग्नन्सीदरम्यान आहाराबाबत अजूनही अंदाजावर अवलंबून राहण्याची सवय आहे. “आनंदी राहण्यासाठी खा” किंवा “मनापासून खा” अशी वाक्य ऐकायला छान वाटतात, पण त्यातून योग्य पोषणाची हमी मिळत नाही, असं ते स्पष्टपणे सांगतात. आजच्या काळात ‘मनापासून खाणं’ म्हणजे अनेकदा जंक फूड, पॅकेज्ड पदार्थ किंवा साखरयुक्त पेयांकडे झुकणं असतं.

भावना महत्त्वाच्या, पण पोषणालाही तितकंच प्राधान्य

अनुष्काच्या बाबतीत, भावना आणि मानसिक आनंद यांना नाकारण्यात आलं नाही. मात्र त्यासोबत संतुलित, पौष्टिक आणि शास्त्रशुद्ध आहार यावर भर देण्यात आला. प्रत्येक घास हा बाळाच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचा आहे, याची पूर्ण जाणीव ठेवून तिचा डाएट प्लॅन तयार करण्यात आला होता.

थोडक्यात सांगायचं तर, अनुष्का शर्माची हेल्दी प्रेग्नन्सी ही कोणत्या डाएट ट्रेंडचा परिणाम नव्हता, तर योग्य नियोजन, अचूक कॅलरी गणित आणि जाणीवपूर्वक खाण्याची सवय यांचा परिणाम होता.

(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. ‘नवशक्ति’ याद्वारे कोणताही दावा करत नाही.)

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक' उद्या ३ तास बंद; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी