Devshayani Ekadashi 2024 Wishes, WhatsApp Status, Images, Quotes, Messages & Greetings Freepik
लाईफस्टाईल

Ashadhi Ekadashi Wishes: 'विठू माउली तू...' आषाढी एकादशी निमित्तम प्रियजनांना पाठवा 'हे' भक्तिपूर्ण शुभेच्छा संदेश!

Tejashree Gaikwad

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीचा उपवास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी यंदा १७ जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. आषाढी एकादशी महाराष्ट्रात मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. असे मानले जाते की आषाढी एकादशीला उपवास केल्यास मनुष्याला धन, आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो.

खास प्रसंगी संगीताशी संबंधित तुमच्या ओळखीतील लोकांना, तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना आणि प्रियजनांना हे खास शुभेच्छा संदेश (Ashadhi Ekadashi 2024 Wishes, WhatsApp Status, Images, Quotes, Messages & Greetings) पाठवू शकता.

पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश

> हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

> सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा,

मेळा जमला भक्तगणांचा,

ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

> “चैतन्याचा गाभा… विटेवर उभा

पालख्यांचा सोहळा नाही.. वारकऱ्यांचा मेळा नाही

मागतो मी पांडुरंगा फक्त एकदान

मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे दान..

पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा

रखूमाईवर उभा विटेवर..

कर कटेवर ठेऊनिया भगवंता,

तव तेज ह्या तिमिरात दे आता”

आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा…!

> सुखासाठी करिसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एकवेळ,

मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी!

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा।

> देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,

सुखालाही आला या हो आनंदाचा पूर,

चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर,

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!!

(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था