छायाचित्र सौ. - Freepik
लाईफस्टाईल

उन्हाळ्यात चहा पिणे टाळा; शरिराला मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे!

चहा हे भारतीय लोकांचं आवडतं पेय आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. ऋतू कोणताही असो अनेकजण चहा पिणे (Harms of Drinking Tea) सोडू शकत नाही. मात्र, उन्हाळ्यात चहा पिणे टाळायला हवे. उन्हाळ्यात तापमान जास्त असते. त्यामुळे शरिराला थंडावा आणि हायड्रेशनची आवश्यकता असते.

Kkhushi Niramish

चहा हे भारतीय लोकांचं आवडतं पेय आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. ऋतू कोणताही असो अनेकजण चहा पिणे (Harms of Drinking Tea) सोडू शकत नाही. मात्र, उन्हाळ्यात चहा पिणे टाळायला हवे. उन्हाळ्यात तापमान जास्त असते. त्यामुळे शरिराला थंडावा आणि हायड्रेशनची आवश्यकता असते. उन्हाळ्यात चहा पिल्याने डिहायड्रेशन, पचनाच्या समस्या इत्यादी अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, या ऋतूत चहा सोडण्याचे किंवा त्याचे सेवन कमी करण्याचे अनेक फायदे आहेत.

डिहायड्रेशन प्रतिबंध

चहामधील कॅफिन आणि टॅनिन शरीरातील पाणी कमी करू शकतात, ज्यामुळे डिहायड्रेशन होते. उन्हाळ्यात जास्त घाम येत असल्याने शरिराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. चहा पिल्याने लघवी येण्याचे प्रमाण वाढते. यामुळे सुद्धा शरिरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. जर तुम्ही चहा पीत नसाल तर शरीर हायड्रेटेड राहते आणि उर्जेची पातळीही कायम राहते.

शरिराचे तापमान नियंत्रणात ठेवणे

चहा हे एक गरम पेय आहे. जे शरिराचे तापमान वाढवू शकते. उन्हाळ्यात शरिराला थंडावा हवा असतो, अशा परिस्थितीत चहा पिल्याने शरिरातील उष्णता वाढू शकते आणि त्यामुळे चिंता किंवा अस्वस्थता येऊ शकते. चहाऐवजी थंड आणि नैसर्गिक पेये पिल्याने शरिराचे तापमान नियंत्रणात राहते.

ऊर्जेची पातळी सुधारते

चहा पिल्याने काही काळ ऊर्जा मिळते, परंतु नंतर तुम्हाला थकवा आणि सुस्ती वाटू शकते. उन्हाळ्यात चहा न पिल्याने शरिराची ऊर्जा पातळी स्थिर राहते आणि तुम्हाला दिवसभर सक्रिय वाटते.

पचनसंस्था अधिक कार्यक्षम होते

उन्हाळ्यात चहा पिल्याने पोटात उष्णता वाढू शकते. ज्यामुळे आम्लपित्त, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात. चहामध्ये असलेले कॅफिन पाचन एंजाइमवर परिणाम करू शकते. त्याऐवजी, लिंबूपाणी, ताक किंवा नारळ पाणी यांसारखे हायड्रेटिंग पेय पिल्याने पचनसंस्था निरोगी राहण्यास आणि शरिराला थंडावा मिळण्यास मदत होते.

चांगली झोप येते

चहामध्ये असलेले कॅफिन मज्जासंस्था सक्रिय करते. ज्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. उन्हाळ्यात, उष्णतेमुळे झोप आधीच कमी असते आणि चहा पिल्याने ही समस्या आणखी वाढू शकते. त्याऐवजी चहा पिणे टाळल्यास चांगली झोप येते आणि शरिराला पूर्ण विश्रांती मिळते.

त्वचेसाठी फायदेशीर

जास्त चहा पिल्याने त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ शकते कारण त्यामुळे शरिरात निर्जलीकरण होते. उन्हाळ्यात चहा न पिल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि मुरुमे, सुरकुत्या यासारख्या समस्या टाळता येतात. याशिवाय, चहा न पिल्याने शरिरातील विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात, ज्यामुळे त्वचा चमकदार राहते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video