लाईफस्टाईल

डोळ्यांचे सौंदर्य खुलवणारे आयलायनर वापरताना 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

डोळे अतिशय संवेदनशील असल्याने आयलायनर वापरताना महत्त्वाची काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

किशोरी घायवट-उबाळे

डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी आयलायनरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, चुकीच्या पद्धतीने किंवा दीर्घकाळ एकाच आयलायनरचा वापर केल्यास डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. डोळे अतिशय संवेदनशील असल्याने आयलायनर वापरताना महत्त्वाची काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

आयलायनर लावताना काय काळजी घ्याल?

  • आयलायनर लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.

  • नेहमी वैयक्तिक आयलायनर वापरावा, इतरांसोबत शेअर करू नये.

  • आयलायनरचा ब्रश किंवा टिप स्वच्छ आणि कोरडी असावी.

  • डोळ्यांच्या आतल्या पाण्याच्या रेषेवर (वॉटरलाईन) आयलायनर लावणे टाळावे.

  • डोळ्यांत जळजळ, खाज, लालसरपणा जाणवल्यास लगेच आयलायनर वापरणे थांबवावे.

  • झोपण्यापूर्वी आयलायनर नीट साफ करून डोळे स्वच्छ धुवावेत.

आयलायनर किती दिवस वापरावा?

  • तज्ज्ञांच्या मते, आयलायनरचा कालावधी मर्यादित असतो.

  • लिक्विड किंवा जेल आयलायनर : ३ ते ६ महिने

  • पेन्सिल आयलायनर : ६ ते १२ महिने

  • एकदा उघडलेला आयलायनर जास्त काळ वापरल्यास त्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते, ज्यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो.

आयलायनर कुठे ठेवायचा?

  • आयलायनर थंड व कोरड्या जागेवर ठेवावा.

  • थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावा.

  • झाकण नेहमी घट्ट बंद करावे.

  • घट्ट वास, रंग बदल किंवा कोरडेपणा जाणवल्यास आयलायनर टाकून द्यावा.

तज्ज्ञांच्या मते, डोळ्यांचे सौंदर्य महत्त्वाचे असले तरी त्यांचे आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे. योग्य कालावधीत आयलायनर बदलणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे नेत्रतज्ज्ञ सांगतात.

पाण्याचे फुगे, जबरदस्तीचा रंग… यंदा चालणार नाही! होळीपूर्वी मुंबई पोलिसांचा कडक इशारा; गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई

Iran vs Israel-US War : मध्यपूर्वेतील युद्धाचा महाराष्ट्राला फटका; विमानसेवा ठप्प, २०० पेक्षा जास्त प्रवासी दुबईत अडकले

कुवैतमध्ये अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ल्याचा दावा; F-15 फायटर जेट कोसळले, Video

'आकाशात असा निष्काळजीपणा'? VSR मालकांचा व्हिडीओ शेअर करत जय पवारांची कारवाईची मागणी; उड्डाणादरम्यान झोपल्याचा दावा

Bigg Boss Marathi 6 : वाइल्ड कार्ड घरात येताच झालं सुरू; रुचिताशी पंगा घेणं रेवाला पडलं महागात, म्हणाली Get Lost!!!