Ai Generated Image
लाईफस्टाईल

उन्हाळ्यात दूध नासू नये म्हणून 'या' सोप्या गोष्टी करा

उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे अनेकवेळा दूध नासण्याचे प्रमाण जास्त असते. दूध नासण्यासाठी अन्यही काही कारणे जबाबदार आहेत. तुमच्या घरातही उन्हाळ्यात सातत्याने दूध नासते का? दूध नासू नये म्हणून या काही टिप्स फॉलो करा. दूध अजिबात नासणार नाही.

Kkhushi Niramish

उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे अनेकवेळा दूध नासण्याचे प्रमाण जास्त असते. दूध नासण्यासाठी अन्यही काही कारणे जबाबदार आहेत. तुमच्या घरातही उन्हाळ्यात सातत्याने दूध नासते का? दूध नासू नये म्हणून या काही टिप्स फॉलो करा. दूध अजिबात नासणार नाही.

दूध गरम करण्याचे भांडे स्वच्छ असावे

दूध नासण्याचे एक प्रमुख कारण दुधाचे भांडे अगदी स्वच्छ असायला हवे. कधी कधी भांडी घासताना आधी तापवलेल्या दुधाचे सूक्ष्म कण भांड्याला तसेच चिकटून राहतात. ते निघत नाहीत. त्याच भांड्यात पुन्हा दूध गरम केल्यास दूध नासते. त्यामुळे दूध तापवण्याचे भांडे कायम स्वच्छ असावे.

दूध तापवण्यासाठी ॲल्युमिनिअमचे भांडे वापरू नये

दूध तापवण्यासाठी किंवा गरम करण्यासाठी ॲल्युमिनिअमच्या भांड्याचा वापर करू नये. यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. तसेच ॲल्युमिनिअच्या भांड्यात दूध नासण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे दूध कायम स्टीलच्या भांड्यात गरम करावे.

दिवसातून कमीत कमी ४ वेळा दूध गरम करावे

उन्हाळ्यात दूध नासू नये म्हणून किमान ४ वेळा दूध गरम करून ते गार होऊ द्यावे.

गरम दूध झाकून ठेवू नये

दूध कधीही उकळल्यानंतर ते लगेच झाकून ठेवू नये. यामुळे तापमानात लगेच बदल झाल्याने दूध नासण्याची खूप दाट शक्यता असते.

दूध कोमट झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवावे

दूध उकळल्यानंतर ते किमान कोमट होईल इतके नैसर्गिकरित्या थंड होवू द्यावे. त्यानंतरच ते फ्रीजमध्ये ठेवावे. गरम दूध फ्रीजमध्ये ठेवल्याने तापमानातील बदलामुळे दूध नासण्याची शक्यता असते.

फ्रीज नसेल तर काय कराल?

तुमच्या घरात फ्रीज नसेल तर तुम्ही तापवलेले दूध कोमट झाल्यानंतर एका पसरट भांड्यात गार पाणी घेऊन दुधाचे भांडे या गार पाण्यात ठेवावे. यामुळे दुधाचे तापमान योग्य राहण्यास मदत मिळते. आणि दूध नासत नाही.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.)

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

कर्जमाफीची अंतिम यादी लवकरच; प्राप्तिकर भरणाऱ्यांची माहिती मिळाल्यानंतरच यादी प्रसिद्ध होणार, पहिल्या टप्प्यात २५ लाख शेतकऱ्यांची नावे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शाही खानपान; खानपानावर प्रत्येक वर्षी ९ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च

Navi Mumbai : कर्तव्य संपले... पण माणुसकी नाही; रबाळे वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने बेशुद्ध कारचालकाला जीवदान

ठाण्यातील अग्निसुरक्षा धाब्यावर; शहरातील आकडेवारीने प्रशासनाची झोप उडाली