बदलत्या हवामानामुळे किंवा कोणत्यातरी कारणामुळे नखांचा रंग बदलतो. थोड्या वेळासाठी नखं नीळसर दिसणं हे सामान्य आहे. मात्र, सतत नखांचा रंग नीळसर वाटत असेल तर ते आरोग्याच्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. यामागे काही विशिष्ट आजार लपलेले असू शकतात.
नखं नीळसर का होतात?
नीळे नख हे शरीरातील ऑक्सिजनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. या स्थितीला सायनोसिस (Cyanosis) म्हणतात. यामध्ये रक्तात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही आणि त्यामुळे नखांच्या खालील त्वचा नीळसर दिसू लागते.
थंड हवामानाचाही परिणाम
थंड हवामानात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे नखांमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचण्यात अडथळा येतो आणि नखांचा रंग नीळसर होतो. उष्ण तापमानात किंवा मालिश केल्यावर नखांचा रंग पुन्हा पूर्ववत होतो. पण, जर सतत नखं नीळी वाटत असतील, तर त्यामागे गंभीर कारण असू शकते.
नीळसर नखांमागील संभाव्य आजार
नखांचा नीळसर रंग फुफ्फुस, हृदय, रक्तवाहिन्या किंवा रक्ताशी संबंधित आजारांमुळे होऊ शकतो. खालील आजार हे कारणीभूत असू शकतात –
COPD (क्रॉनिक ब्रॉन्कायटिस किंवा एम्फिसेमा)
अस्थमा
निमोनिया
फुफ्फुसातील रक्ताचा अडथळा (Pulmonary Embolism)
जन्मजात हृदयविकार
इशारेन्मर्जर सिंड्रोम
हृदय निकामी होणे (Heart Failure)
असामान्य रक्तवाहिन्या
Raynaud's Phenomenon
निदान आणि उपाय
नीळसर नखांसाठी डॉक्टरांकडून तपासणी गरजेची असते.
Pulse Oximeter – रक्तातील ऑक्सिजन मोजण्याचे सर्वात सोपे साधन
ABG Test (Arterial Blood Gas) – हे परीक्षण नीळसरपणामागे नक्की कोणते कारण आहे हे स्पष्ट करते.
उपचारामध्ये मुख्यतः रक्तात ऑक्सिजनचा पुरवठा सुधारण्यावर भर दिला जातो.
डॉक्टरकडे केव्हा जावे?
खालील लक्षणं आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या –
श्वास घेण्यास त्रास
छातीत दुखणं
प्रचंड घाम येणे
चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे
(Disclaimer: हा लेख इंटरनेटवर उपलब्ध माहितीवर आधारित आहे. याची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)