ख्रिसमसमध्ये स्वस्तात करा घराची सजावट; 'या' बजेट-फ्रेंडली क्रिएटिव्ह आयडिया ठरतील उपयोगी  
लाईफस्टाईल

ख्रिसमसमध्ये स्वस्तात करा घराची सजावट; 'या' बजेट-फ्रेंडली क्रिएटिव्ह आयडिया ठरतील उपयोगी

ख्रिसमस म्हटलं की घरभर उजेड, रंगीबेरंगी सजावट आणि आनंदाचं वातावरण! पण यासाठी खूप खर्च करावा लागेल असं नाही. थोडी क्रिएटिव्हिटी आणि काही छोटी साधी साधनं वापरून तुम्ही अगदी बजेटमध्ये घरात सुंदर ख्रिसमस लूक तयार करू शकता.

Mayuri Gawade

ख्रिसमस म्हटलं की घरभर उजेड, रंगीबेरंगी सजावट आणि आनंदाचं वातावरण! पण यासाठी खूप खर्च करावा लागेल असं नाही. थोडी क्रिएटिव्हिटी आणि काही छोटी साधी साधनं वापरून तुम्ही अगदी बजेटमध्ये घरात सुंदर ख्रिसमस लूक तयार करू शकता.

१) घरच्या घरी बनवा छोट्या सजावटीच्या वस्तु

महागडे डेकोरेशन घेण्यापेक्षा घरीच थर्माकोल बॉल, जुनी बटणं, रिबिन्स, रंगीत कागद वापरून सुंदर वस्तु बनवा. या प्रक्रियेत मुलांनाही सहभागी करून घ्या. घरची क्राफ्ट अ‍ॅक्टिव्हिटी आणि ट्रीवर तुम्ही स्वतः बनवलेल्या सजावटीच्या वस्तु या दोन्ही गोष्टी सण अधिक खास बनवतात.

२) जुन्या वस्तूंना नवा ब्लिंग (Recycling Decor )

जुनी काचेची बाटली, फेरी लाइट आणि काही रिबिन्स वापरून तुम्ही उठावदार सेंटरपीस तयार करू शकता. रिकाम्या कँडल जार्सना गोल्डन स्प्रे देऊन त्यांना classy look देता येतो. तसेच, वापरात नसलेले पुठ्ठ्याचे बॉक्स छोटे गिफ्ट बॉक्सेस म्हणून वापरता येतात.

३) Christmas Tree नसला तरी चालेल! ( Alternative Tree Ideas)

फेरी लाइटने भिंतीवर ट्रीचा आकार बनवा किंवा घरातील पुस्तकं पिरॅमिडप्रमाणे रचून एक यूनिक बुक-ट्री तयार करा. लहान जागेत राहणाऱ्यांसाठी हा पर्याय खूपच सोयीचा आहे.

४) 500 रुपयांच्या आत 'Festive Corner'

फेरी लाइट (८०-१२० रु), साध्या कँडल्स (३०-५० रु) आणि काही टिनसेल (५०-१०० रु) वापरून तुमच्या हॉलमध्ये एक छोटासा फेस्टिव्ह कॉर्नर तयार करता येतो. हवं असल्यास घरातल्या फुलांपासून तयार केलेला छोटा बुके ठेवून तो अधिक आकर्षक करा.

५) पर्यावरणपूरक सजावट

जुन्या चटया, रंगीबेरंगी कापडाचे तुकडे, लहान काचेचे ग्लास किंवा रिकामे जार वापरून टेबल आणि खिडकी सजवा. कापडाचा छोटा तुकडा जारभोवती बांधला तरी तो एक छान कँडल होल्डर बनतो. फुलांच्या पाकळ्या, पाने किंवा लहान दगड वापरून टेबल सजवलं की त्या नैसर्गिक घटकांनी घरात एक साधं, शांत आणि सुंदर वातावरण तयार होतं.

या वर्षी जास्त खर्च न करता, क्रिएटिव्हिटी वापरून यंदाचा सण अधिक सुंदर, रंगतदार आणि खास बनवा!

IndiGoची मोठी घोषणा; प्रवाशांचे पैसे परत मिळणार, री-शेड्युलिंग शुल्क शून्य

नाशिकच्या १८०० झाडांवर कुऱ्हाड? मनसेनंतर आदित्य ठाकरेंची एंट्री; भाजप-बिल्डर लॉबीवर घणाघात, "भाजपच्या बिल्डर मित्रांची...

Thane : भिवंडीत डॉ. बाबासाहेबांच्या श्रद्धांजली बॅनरचा अपमान; दोघांविरोधात गुन्हा दाखल

महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आंबेडकरांना अभिवादन; "त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारत...

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी झाली सरवणकरांची सून; लग्नानंतर नवदाम्पत्य पोहचलं सिद्धिविनायक मंदिरात! पाहा खास Photos