गाजर-कोथिंबीर ज्यूसने वाढेल इम्युनिटी; जाणून घ्या सोपी रेसिपी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

गाजर-कोथिंबीर ज्यूसने वाढेल इम्युनिटी; जाणून घ्या सोपी रेसिपी

व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स असलेला गाजर-कोथिंबीर ज्यूस शरीर डिटॉक्स ठेवण्यास, इम्युनिटी वाढवण्यास आणि त्वचा-डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो.

किशोरी घायवट-उबाळे

सकाळची सुरुवात हेल्दी आणि फ्रेश ड्रिंकने करायची असेल, तर गाजर आणि कोथिंबिरीपासून तयार होणारा हा पौष्टिक ज्यूस उत्तम पर्याय ठरू शकतो. व्हिटॅमिन C, अँटिऑक्सिडंट्स आणि शरीरासाठी उपयुक्त वनस्पती घटकांनी भरलेला हा डिटॉक्स ड्रिंक इम्युनिटी वाढवण्यास, त्वचा निरोगी ठेवण्यास आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो. विशेष म्हणजे हा ज्यूस अवघ्या काही मिनिटांत घरच्या घरी सहज तयार करता येतो.

साहित्य :

  • ४ ते ५ गाजर (किसलेले)

  • कोथिंबीर

  • अर्धा चमचा आले

  • चवीनुसार मीठ

  • चिमूटभर मिरीपूड

  • १ चमचा लिंबाचा रस (ऐच्छिक)

  • आवश्यकतेनुसार पाणी किंवा बर्फाचे तुकडे

कृती :

सर्वप्रथम गाजर, कोथिंबीर आणि आले मिक्सरमध्ये घालून एकत्र ब्लेंड करा. आवश्यकतेनुसार पाणी किंवा बर्फाचे तुकडे घालून ज्यूसची कन्सिस्टन्सी पातळ करा. त्यानंतर त्यात मीठ, मिरीपूड आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित हलवा. तयार ज्यूस लगेच सर्व्ह करा.

ज्यूसचे फायदे :

  • शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते.

  • त्वचा चमकदार ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

  • डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर.

  • इम्युनिटी वाढवण्यास मदत होते.

  • पचनक्रिया सुधारण्यास उपयोगी पडते.

टिप्स :

  • अधिक फ्रेश चव हवी असल्यास काही पुदिन्याची पाने घालू शकता.

  • साखर टाळून नैसर्गिक चव ठेवल्यास हा ज्यूस अधिक हेल्दी ठरतो.

  • सकाळी रिकाम्या पोटी हा ज्यूस पिल्यास अधिक फायदा होऊ शकतो.

  • ज्यूस बनवल्यानंतर लगेच पिणे उत्तम, त्यामुळे पोषक घटक टिकून राहतात.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके