चीज आणि मसाल्याचा परफेक्ट मेळ! तोंडाला पाणी सुटेल असा म्हैसूर मसाला डोसा; फॉलो करा ही सोपी रेसिपी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

चीज आणि मसाल्याचा परफेक्ट मेळ! तोंडाला पाणी सुटेल असा म्हैसूर मसाला डोसा; फॉलो करा ही सोपी रेसिपी

Cheese Mysore Masala Dosa Recipe : मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा चीज आणि मसाल्याचा परफेक्ट मेळ असलेला स्वादिष्ट म्हैसूर मसाला डोसा घरच्या घरी कसा बनवायचा, जाणून घ्या ही सोपी रेसिपी.

किशोरी घायवट-उबाळे

डोसा हा दक्षिण भारतीय पदार्थ असला तरी आज तो देशभरात लोकप्रिय आहे. कुरकुरीत डोसा, मसालेदार बटाट्याची भाजी आणि त्यावर भरपूर चीज यामुळे चीज म्हैसूर मसाला डोसा अधिकच चविष्ट लागतो. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हा डोसा तयार करून तुम्ही कुटुंबीयांचे कौतुक मिळवू शकता.

साहित्य :

डोशाच्या पिठासाठी

  • २ कप तांदूळ

  • १/२ टीस्पून उडीद डाळ

  • ३ टीस्पून चणा डाळ

  • १ टीस्पून मेथी दाणे

  • चवीनुसार मीठ

बटाटा मसाल्यासाठी

  • १ टेबलस्पून तेल

  • १ लहान कांदा (बारीक चिरलेला)

  • २ हिरव्या मिरच्या

  • २ उकडलेले व कुस्करलेले बटाटे

  • १ टीस्पून मेथी दाणे

  • १/२ टीस्पून हळद

  • १/२ टीस्पून उडीद डाळ

  • १/२ टीस्पून चणा डाळ

  • अर्धा इंच आले (बारीक चिरलेले)

  • कढीपत्त्याची एक फांदी

  • चवीनुसार मीठ

म्हैसूर मसाल्यासाठी

  • २ ते ३ टीस्पून बटर

  • २ टेबलस्पून कांदा (चिरलेला)

  • २ टेबलस्पून ढोबळी मिरची (चिरलेली)

  • २ टेबलस्पून किसलेले गाजर

  • १ टीस्पून लाल तिखट

  • अर्धा टोमॅटो (चिरलेला)

  • २ टीस्पून पावभाजी मसाला

  • चवीनुसार मीठ

  • आवश्यकतेनुसार किसलेले चीज

कृती :

तांदूळ, उडीद डाळ, चणा डाळ आणि मेथी दाणे स्वच्छ धुवून ३ ते ४ तास भिजत ठेवा. नंतर त्याची बारीक पेस्ट करून पीठ तयार करा. त्यात मीठ घालून झाकून काही तास आंबण्यासाठी ठेवा.

कढईत तेल गरम करून मेथी दाणे, उडीद डाळ आणि चणा डाळ परता. त्यात कांदा, हिरवी मिरची, आले, कढीपत्ता, हळद आणि मीठ घाला. नंतर कुस्करलेले बटाटे घालून सर्व मिश्रण चांगले परतून घ्या.

दुसऱ्या पॅनमध्ये बटर गरम करून कांदा परता. त्यात ढोबळी मिरची, गाजर, टोमॅटो, लाल तिखट, पावभाजी मसाला आणि मीठ घालून २ ते ३ मिनिटे शिजवा. तयार बटाटा मसाला आणि म्हैसूर मसाला एकत्र करून नीट मिक्स करा.

तवा गरम करून त्यावर थोडे पाणी शिंपडा. एक डाव पीठ घेऊन गोलाकार पसरवा. डोसा कुरकुरीत होऊ लागल्यावर त्यावर लाल चटणी लावा. मध्ये तयार मसाला ठेवा आणि वरून भरपूर किसलेले चीज भुरभुरा. डोसा दुमडून एक मिनिट शिजवा.

गरमागरम चीज म्हैसूर मसाला डोसा सांबार आणि नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

टिप्स :

  • डोसा अधिक कुरकुरीत हवा असल्यास पिठात थोडे पोहे घालू शकता.

  • मोझरेला आणि प्रोसेस्ड चीज एकत्र वापरल्यास चव अधिक छान लागते.

  • लाल चटणीमुळे डोशाला अस्सल म्हैसूर फ्लेवर मिळतो.

  • मुलांसाठी बनवत असल्यास तिखटाचे प्रमाण कमी ठेवा.

ही रेसिपी विकेंड ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

'४८ तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशव्यापी आंदोलन'; CJP च्या अभिजीत दिपकेंचा ज्ञानेश कुमार यांना इशारा

Mumbai : गणपती विसर्जनासाठी उद्या कुठे वाहतूक बंद? लोकल, मेट्रो आणि पार्किंगबाबतही महत्त्वाचे अपडेट

Ganeshotsav 2026 : 'मुंबईचा राजा' चा यंदा अनोखा विसर्जन सोहळा; २२ फुटांचा गणराया जहाजाने खोल समुद्रात जाणार

Pune : गणपती विसर्जनासाठी वाहतूकीत मोठे बदल; ४८ तास अवजड वाहनांना प्रवेशबंदी, १७ प्रमुख रस्ते बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

बंगळुरूतील CEO ची मोठी घोषणा; "४ राज्यांतील पुरुषांना नोकरी देणार नाही", सोशल मीडियावर चर्चेला उधाण