चहा-कॉफीऐवजी सकाळी प्या नारळपाणी; वाचा तज्ज्ञ काय सांगतात 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

चहा-कॉफीऐवजी सकाळी प्या नारळपाणी; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

किडनीसंबंधित आजार असलेल्या किंवा पोटॅशियम नियंत्रित आहार घेणाऱ्या व्यक्तींनी नियमित नारळपाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

किशोरी घायवट-उबाळे

सकाळी उठल्यानंतर आपण काय खातो किंवा पितो, याचा थेट परिणाम शरीराच्या हायड्रेशन, पचनक्रिया आणि ऊर्जा पातळीवर होतो. अशावेळी रिकाम्या पोटी नारळपाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.

रात्रभर उपाशी राहिल्यानंतर सकाळी शरीर हलक्याफुलक्या डिहायड्रेशनच्या अवस्थेत असतं. त्यामुळे दिवसाची सुरुवात कोणत्या पेयाने होते, याला विशेष महत्त्व असतं. काहीजण सकाळी चहा किंवा कॉफी घेतात, तर काहीजण हलक्या पेयांना प्राधान्य देतात. मात्र, रिकाम्या पोटी नारळपाणी पिण्याचे शरीराला अनेक फायदे होऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे.

सकाळी नारळपाणी पिण्याचे फायदे

१. शरीरातील पाण्याची आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढण्यास मदत

रात्रभर उपाशी राहिल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. नारळपाण्यामध्ये सुमारे ९४ टक्के पाणी असतं. याशिवाय त्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीरातील द्रव संतुलन सुधारण्यास मदत करतात.

२. पचनक्रिया सुधारण्यास मदत

रिकाम्या पोटी नारळपाणी पिल्याने पचनसंस्था सक्रिय होण्यास मदत मिळू शकते. त्यामधील नैसर्गिक एन्झाइम्स आणि बायोॲक्टिव्ह घटक पचन सुधारण्यास मदत करतात. नारळपाणी पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतं.

३. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर

नारळपाण्यात पोटॅशियमचं प्रमाण अधिक असतं, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं. सकाळी रिकाम्या पोटी नारळपाणी घेतल्यास शरीराला पोटॅशियम अधिक प्रभावीपणे शोषून घेण्यास मदत होऊ शकते. संशोधनानुसार, नारळपाणी हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतं.

४. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत

नारळपाणी हे नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक मानलं जातं. सकाळी ते पिल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत मिळू शकते. नारळपाण्यामुळे लघवीचं प्रमाण वाढू शकतं, ज्यामुळे किडनीचं कार्य सुधारण्यास मदत होते.

५. शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते

चहा किंवा कॉफीऐवजी नारळपाणी घेतल्यास शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळू शकते. त्यातील नैसर्गिक साखर आणि मिनरल्स शरीरातील थकवा कमी करण्यास मदत करतात. यामुळे शरीर अधिक ताजंतवानं वाटू शकतं.

नारळपाणी पिण्याचे काही दुष्परिणाम आहेत का?

तज्ज्ञांच्या मते, नारळपाणी बहुतेक लोकांसाठी सुरक्षित असलं तरी त्याचं अतिसेवन टाळणं गरजेचं आहे. डॉ. सुरभी सिद्धार्थ यांच्या मते, जास्त प्रमाणात नारळपाणी घेतल्यास शरीरातील पोटॅशियमची पातळी वाढू शकते. यामुळे किडनीच्या कार्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. काही लोकांना पोट फुगणे किंवा पचनासंबंधित त्रासही जाणवू शकतो.

किडनीसंबंधित आजार असलेल्या किंवा पोटॅशियम नियंत्रित आहार घेणाऱ्या व्यक्तींनी नियमित नारळपाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

नारळपाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

तज्ज्ञांच्या मते, नारळपाणी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पिणं महत्त्वाचं आहे.

  • शक्यतो ताजं नारळपाणी प्या.

  • सकाळी रिकाम्या पोटी नारळपाणी पिणं अधिक फायदेशीर ठरू शकतं.

  • दररोज सुमारे २०० ते २५० मिली नारळपाणी पुरेसं मानलं जातं.

  • नारळपाणी घेतल्यानंतर १५ ते २० मिनिटांनी नाश्ता करावा.

  • नारळपाण्यानंतर लगेच जड पदार्थ खाणं टाळावं.

तज्ज्ञांच्या मते, प्रमाणात आणि नियमितपणे नारळपाणी घेतल्यास शरीराच्या हायड्रेशन, पचनक्रिया आणि ऊर्जा पातळीवर सकारात्मक परिणाम दिसू शकतो.

आजचे राशिभविष्य, २७ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया झाले जुळ्या मुलांचे आई-बाबा; "मेरे करन-अर्जुन आ गए" म्हणत दिली गोड बातमी

महाराष्ट्रातील आठ जणांना ‘पद्म' पुरस्कार प्रदान

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रमाकांत दायमा काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वात शोककळा

Mumbai : झाडांवर विषप्रयोग केला तर थेट गुन्हा दाखल होणार; बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला यांचे निर्देश