Freepik
लाईफस्टाईल

Maharashtra SSC 10th Results 2024: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे करा कौतुक, 'हे' शुभेच्छा संदेश पाठवून करा अभिनंदन!

Congratulations Messages in Marathi: दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा संदेश पाठवून त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करा.

Tejashree Gaikwad

Wishes for SSC 10th Pass out Students: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहाचा निकाल जाहीर केला आहे. वर्षभर भरपूर मेहनत करून यंदा १५ लाख १७ हजार ८०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यंदा राज्याचा ९३. ८३ टक्के इतका निकाल लागला आहे. या भरगोस यशासह विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. मेहनत केल्यानंतर यश मिळते आणि यश मिळाल्यावर आनंद मिळतो. हा मेहनीतीचा आनंद साजरा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत (SSC 10th Result Wishes, Status, Images, Quotes, Messages & Greetings) शुभेच्छा संदेश.

पाठवा हे शुभेच्छा संदेश

> दहावी पास होणं हे नव्या आयुष्याची आणि नव्या मार्गाची सुरूवात आहे.

हे यश प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा...

> आम्हाला सर्वांना अभिमान वाटेल असंच काम तू केलं आहेस आणि तुझ्या या यशाबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन. असेच यश वर्षोनुवर्षे मिळत राहो! Congratulations

> अप्रतिम यश! चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा.

>  मेहनत नेहमी फळाला येते हे तू पुन्हा एकदा दाखवून दिलंस.

तुझ्या परीक्षेत उत्तम यश मिळालं यातच सर्व काही आलं.

तुझ्या मेहनतीने मिळवलेल्या यशासाठी खूप खूप अभिनंदन!

> प्रेमपूर्वक आणि अभिमानाने तुझे हार्दिक अभिनंदन. तुला कल्पनाही करता येणार नाही इतके तुझ्या यशासाठी मला आनंद झाला आहे. Congratulations!!

(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)

BCCI कडून महाभियोगची तयारी; कुणकुण लागताच मोहसीन नक्वींनी UAE बोर्डाकडे सुपूर्द केली ट्रॉफी : रिपोर्ट

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार