लाईफस्टाईल

‘या’ गोष्टींचे सेवन करा आणि रहा नेहमी फिट

Rutuja Karpe

माणसाचे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फक्त आहारावरच नाही तर खाण्यापिण्याच्या पद्धतीवर ही अनेक गोष्टी अवलंबून असतात. अन्नपदार्थांमधून योग्य प्रमाणात पोषण मिळण्यासाठी योग्य गोष्टी योग्य वेळी खाणे आवश्यक आहे. तसेच योग्य अन्नपदार्थ एकत्र करून खाल्ल्यानेही शरीराला आवश्यक घटक मिळतात. त्यामुळे कोण कोणत्या गोष्टी एकत्र खाल्ल्याने तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतात ते जाणून घेवूयात… 

दही आणि केळे-

दही आणि केळे या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. या दोन्ही गोष्टी एकत्र करून खाल्ल्याने जास्त फायदा होऊ शकतो. व्यायामानंतर दही आणि केळीचे सेवन केल्यास स्नायू मजबूत होतात. हे अमिनो अ‍ॅसिड आणि ग्लुकोज सारखे कार्य करते, ज्यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात.

अंडे आणि सलाड
तळलेल्या अंड्यासह सॅलड खातात त्यांना लायकोपीन आणि बीटा-कॅरोटीन अँटीऑक्सिडंट्ससह अधिक कॅरोटीनॉइड्स मिळतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

पालक
पालकमध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतं. हे प्रोटीन मसल्स वाढवण्यास मदत करते.

संत्री, टोमॅटो आणि बेरी-
संत्री, टोमॅटो आणि बेरी या गोष्टी एकत्र करून खाल्ल्याने आयर्नच्या कमतरतेमुळे मेंदू आणि स्नायूंवर होणारा परिणाम दूर होते. व्हिटॅमिन सी साठी, संत्री, टोमॅटो आणि बेरी यासारख्या गोष्टींचे सेवन करू शकता.

ग्रीन टी आणि लेमन ज्यूस
ग्रीन टी आणि लेमन ज्यूस ही दोन्ही अशी पेये आहेत ज्यात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे शरीरात साचलेली घाण बाहेर काढण्यास मदत करतात. ज्यामुळे इम्युनिटी वाढते. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसारखे आजार होण्याची शक्यता खूपच कमी होते.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त