उकाड्यामुळे झोप लागत नाही? कूलिंग ब्लँकेट ठरू शकतो बेस्ट पर्याय, जाणून घ्या फायदे 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

उकाड्यामुळे झोप लागत नाही? कूलिंग ब्लँकेट ठरू शकतो बेस्ट पर्याय, जाणून घ्या फायदे

Cooling Blanket : उन्हाळ्यात उकाडा, घाम आणि झोपेचा त्रास होत असेल तर कूलिंग ब्लँकेट हा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याचे फायदे, वापर आणि योग्य निवड कशी करावी हे जाणून घ्या.

किशोरी घायवट-उबाळे

रात्री उकाड्यामुळे वारंवार जाग येणं, घाम येणं आणि ब्लँकेट घ्यावं की काढावं या गोंधळात अनेकांची झोप बिघडते. उन्हाळ्यातील हा त्रास कमी करण्यासाठी आता 'कूलिंग ब्लँकेट' हा एक सोपा आणि उपयोगी पर्याय ठरत आहे. यामुळे उकाडा कमी जाणवतो आणि चांगली झोप लागते.

कूलिंग ब्लँकेट म्हणजे काय?

कूलिंग ब्लँकेट म्हणजे शरीर थंड ठेवणारं खास ब्लँकेट. हे उष्णता कमी जाणवू देतं आणि झोपताना गारवा देतं, त्यामुळे झोप अधिक आरामात लागते.

हे ब्लँकेट कसं काम करतं?

या ब्लँकेटचं कापड घाम पटकन शोषून घेतं आणि त्याची लवकर वाफ होऊ देतं. त्यामुळे शरीर चिकट वाटत नाही आणि उकाडा कमी जाणवतो.

कूलिंग ब्लँकेट कोणत्या मटेरियलचं असतं?

  • बांबू फायबर

  • युकॅलिप्टस फायबर

  • हलकं आणि मऊ कापड

या प्रकारचे कापड थंड असतात ज्यामुळे गरम न होता उकाड्यातही थंडावा जाणवतो.

निवड करताना काय लक्षात ठेवाल?

  • हलकं आणि हवेशीर कापड निवडा.

  • खूप जड ब्लँकेट टाळा.

  • सहज धुता येईल असं ब्लँकेट घ्या.

  • ब्लँकेट स्वच्छ ठेवा.

घराच्या लुकमध्येही भर

कूलिंग ब्लँकेटमुळे फक्त झोपताना थंडावा जाणवतो असं नाही तर यामुळे खोलीतील तापमानदेखील कमी राहून खोली थंड राहते. उन्हाळ्यात झोप न लागणं ही सामान्य समस्या आहे. पण कूलिंग ब्लँकेट वापरल्यास उकाडा कमी होऊन झोप अधिक आरामात लागू शकते. हे कूलिंग ब्लँकेट ऑनलाईनही सहज उपलब्ध आहेत.

(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली