Freepik
लाईफस्टाईल

पायांना भेगा पडल्या आहेत? 'हे' उपाय देतील तातडीचा आराम, टाचा होतील मऊ

दैनंदिन धावपळीच्या कामात आपल्याला आपल्या तळपाय आणि टाचांकडे लक्ष देणे शक्य होत नाही. अनेक वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परिणामी पायाच्या टाचांना भेगा पडतात. योग्य वेळी योग्य ती काळजी घेतल्यास अशा समस्या उद्भवत नाही. जाणून घ्या पायांना भेगा पडण्याचे नेमके कारण काय असते. यावर घरच्या घरी कोणते प्रभावी उपाय करता येईल.

Kkhushi Niramish

दैनंदिन धावपळीच्या कामात आपल्याला आपल्या तळपाय आणि टाचांकडे लक्ष देणे शक्य होत नाही. अनेक वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परिणामी पायाच्या टाचांना भेगा पडतात. योग्य वेळी योग्य ती काळजी घेतल्यास अशा समस्या उद्भवत नाही. जाणून घ्या पायांना भेगा पडण्याचे नेमके कारण काय असते. यावर घरच्या घरी कोणते प्रभावी उपाय करता येईल.

पायांना भेगा पडण्याची कारणे

पायाच्या टाचांना भेगा पडण्याची कारणे वेगवेगळी असतात. अनेक वेळा केवळी तळपाय, टाचा नीट स्वच्छ न केल्याने या समस्या उद्भवतात. काही वेळा त्वचा कोरडी पडल्याने किंवा शरीरात मोठ्या प्रमाणात उष्णता असेल तर टाचांवर त्याचा परिणाम होतो आणि भेगा पडायला लागतात. काही वेळा हे अनुवांशिक असू शकते. तर कधी कधी पायाच्या टाचांना भेगा पडणे हे शरीरातील व्हिटामिन्सच्या कमतरतेकडे संकेत देते. शरीरातील हार्मोन्समधील बदलाने सुद्धा याचे प्रमाण वाढते.

काय आहेत घरगुती उपाय?

उत्तम प्रतीचे बूट घालणे

पायांना भेगा पडल्या असेल आणि ही समस्या वारंवार होत असेल तर चप्पल ऐवजी बूट वापरायला सुरुवात करावी. पायात उत्तम प्रतीचे बूट घालणे यामुळे पाय संपूर्ण दिवस पॅक राहतो. त्यामुळे धुळीचा संपर्क कमी होतो. त्याचा चांगला फायदा होऊन पायातील भेगा भरून येण्यासाठी मदत होते.

तेलाने मसाज करणे

खोबरेल तेल लावून हलक्या हाताने तळपायांना मालिश करणे. यामुळे टाचा दुखत असेल तर त्यातून आराम मिळतो. टाचा हळूहळू मऊ व्हायला सुरुवात होईल.

तूप

पायाच्या भेगा भरून येण्यासाठी तूप लावणे हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. तुपातील औषधी गुणांमुळे भेगा लगेचच भरून येण्यास मदत मिळते.

मॉइश्चरायझर लावणे

पायाच्या भेगांना चांगल्या गुणवत्तेचे मॉइश्चरायझर लावल्याने देखील भेगा लवकर भरून येतात.

मेहंदी लावणे

मेहंदी ही फार बहुगुणी आहे. तिचा उपयोग केवळ सण उत्सवांमध्ये हातांवर मेहंदी डिझाईन काढण्यापुरता मर्यादित नाही. तर केसांच्या तसेच आरोग्याच्या अन्य समस्यांवरही तिचा उपयोग होतो. मेहंदी शरीरातील उष्णता बाहेर खेचून काढते. त्यामुळे तुम्हाला जर उष्णतेच्या त्रासामुळे पायांना भेगा पडल्या असेल तर आठवड्यातून दोन वेळा तळपायांना मेहंदी लावावी. यामुळे पायाच्या भेगा लवकर भरून येण्यास मदत होईल.

अशी घ्या काळजी

रात्री झोपण्यापूर्वी तळपाय स्वच्छ धुवून कोरडे करावेत. त्यानंतर पायाच्या भेगांना तेल, तूप, मॉइश्चरायझर लावावे. त्यानंतर पायात सॉक्स घालावे. अशा प्रकारे काळजी घेतल्यास निश्चितच पायाच्या टाचांना पडलेल्या भेगा भरून येतील.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video