Summer Special : क्रीमी मँगो आईस्क्रीम; चव अशी की मुलं खुश होतील, वाचा रेसिपी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Summer Special : क्रीमी मँगो आईस्क्रीम; चव अशी की मुलं खुश होतील, वाचा रेसिपी

उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा ताज्या आंब्याचे क्रीमी मँगो आईस्क्रीम. कमी साहित्यांत तयार होणारी ही सोपी, थंडगार आणि चविष्ट रेसिपी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल.

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळा म्हटलं की आंबा आणि आईस्क्रीम ही जोडी प्रत्येकाचीच आवडती. बाजारातील आईस्क्रीमपेक्षा घरच्या घरी तयार केलेले ताज्या आंब्याचे क्रीमी मँगो आईस्क्रीम अधिक चविष्ट, हेल्दी आणि फ्रेश लागते. अगदी कमी साहित्यांत आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी उन्हाळ्यात मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल.

ताज्या आंब्याचा गोडवा, फ्रेश क्रीमचे मऊसर टेक्स्चर आणि थंडगार आईस्क्रीमचा क्रीमी स्वाद यामुळे ही रेसिपी उन्हाळ्यातील परफेक्ट डेझर्ट ठरते. पाहुण्यांसाठी असो किंवा दुपारच्या उकाड्यात काहीतरी थंडगार खायची इच्छा असो, हे होममेड मँगो आईस्क्रीम नक्की ट्राय करा.

साहित्य :

  • २ पिकलेले आंबे

  • १ कप दूध

  • १ कप फ्रेश क्रीम

  • ४ टेबलस्पून मिल्क पावडर

  • ४ ते ५ टेबलस्पून साखर

कृती :

सर्वप्रथम आंबे सोलून त्याचा गर वेगळा काढा. हा गर मिक्सरमध्ये घालून स्मूद प्युरी तयार करून घ्या. यानंतर मिक्सर जारमध्ये आंब्याची प्युरी, दूध, फ्रेश क्रीम, मिल्क पावडर आणि साखर घालून सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत ब्लेंड करा. मिश्रण क्रीमी आणि गाठीविरहित झाले की ते एअरटाइट डब्यात काढा.

हा डबा ७ ते ८ तास फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. मध्ये एकदा बाहेर काढून हलकेच ढवळून पुन्हा सेट केल्यास आईस्क्रीम अधिक मऊ आणि क्रीमी होते.

आईस्क्रीम सेट झाल्यानंतर स्कूप करून सर्व्ह करा. वरून आंब्याचे छोटे तुकडे घालून सर्व्ह केल्यास चव आणखी वाढते.

टिप्स :

  • गोड आणि पिकलेले आंबे वापरल्यास आईस्क्रीमचा स्वाद अधिक छान लागतो.

  • अधिक क्रीमी टेक्स्चरसाठी मिश्रण एकदा सेट झाल्यानंतर पुन्हा ब्लेंड करून फ्रीज करा.

  • साखरेचे प्रमाण आंब्याच्या गोडीनुसार कमी-जास्त करू शकता.

  • सर्व्ह करताना वर ड्रायफ्रूट्स किंवा आंब्याचे तुकडे घातल्यास चव छान लागते.

  • रिच फ्लेवरसाठी एक चिमूट वेलची पूडही घालू शकता.

माघार नाहीच; UPI शुल्काबाबत सरकार ठाम, व्यापारी नाराज; रोखीचे व्यवहार वाढण्याची भीती

११ रुपयांचा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना! वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा, तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

Maratha Reservation : मनोज जरांगे आज दुपारी मुंबईकडे निघणार

आमदारांचे बहुमत ही कसोटी पुरेशी आहे? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

भाजप आमदार मेहतांची 'शरणागती'; भाईंदरमधील जमीन करावी लागली परत, पंतप्रधानांच्या भेटीनंतर शाळासोबत्याला दिलासा