साबुदाणा खाऊन कंटाळलात? यावेळी ट्राय करा कुरकुरीत 'मखाना ड्रायफ्रूट नमकीन'; वाचा सोपी रेसिपी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

साबुदाणा खाऊन कंटाळलात? यावेळी ट्राय करा कुरकुरीत 'मखाना ड्रायफ्रूट नमकीन'; वाचा सोपी रेसिपी

विशेष म्हणजे हवाबंद डब्यात ठेवला तर हा नमकीन सुमारे १० दिवस ताजा आणि कुरकुरीत राहतो.

किशोरी घायवट-उबाळे

उपवासात नेहमी साबुदाणा, बटाटा किंवा फराळाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी पौष्टिक आणि चविष्ट मखाना ड्रायफ्रूट नमकीन करून पाहा. मखाना, शेंगदाणे, काजू, बदाम आणि इतर ड्रायफ्रूट्सपासून तयार होणारा हा फराळाचा पदार्थ अतिशय कुरकुरीत लागतो. विशेष म्हणजे हवाबंद डब्यात ठेवला तर हा नमकीन सुमारे १० दिवस ताजा आणि कुरकुरीत राहतो.

साहित्य :

  • १०० ग्रॅम मखाना

  • १ कप शेंगदाणे

  • १ कप बदाम

  • १ कप काजू

  • अर्धा कप टरबूजाच्या बिया

  • १ कप मनुका

  • १ कप लांब कापलेले सुके खोबऱ्याचे काप

  • ७ ते ८ कढीपत्त्याची पाने

  • ३ हिरव्या मिरच्या

  • १ टीस्पून काळी मिरी पावडर

  • चवीनुसार सैंधव मीठ

  • २ टेबलस्पून पिठीसाखर

  • अर्धा टीस्पून तिखट

  • १ टीस्पून भाजलेली जिरेपूड

  • ३ टेबलस्पून साजूक तूप

कृती :

१. कढईत १ टेबलस्पून साजूक तूप गरम करून मंद आचेवर शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत भाजून काढा.

२. त्याच कढईत बदाम, काजू आणि टरबूजाच्या बिया एकामागून एक भाजून वेगळ्या भांड्यात काढा.

३. आता मनुका काही सेकंद परतून घ्या. त्यानंतर खोबऱ्याचे काप हलके सोनेरी होईपर्यंत भाजा.

४. आवश्यक असल्यास थोडे तूप घाला. त्यात हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता काही सेकंद परता.

५. आता मखाना घालून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजा.

६. त्यात भाजलेले सर्व ड्रायफ्रूट्स आणि खोबरे घाला.

७. शेवटी सैंधव मीठ, काळी मिरी, तिखट, भाजलेली जिरेपूड आणि पिठीसाखर घालून सर्व साहित्य चांगले मिसळा.

८. गॅस बंद करा. नमकीन पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा आणि उपवासात मनसोक्त आस्वाद घ्या.

टिप्स :

  • मखाना नेहमी मंद आचेवर भाजा, त्यामुळे तो अधिक कुरकुरीत होतो.

  • साजूक तूप वापरल्यास नमकीनची चव आणि सुगंध अधिक खुलतो.

  • नमकीन पूर्ण थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भरावे, त्यामुळे तो १० दिवसांपर्यंत कुरकुरीत राहतो.

  • तिखटाचे प्रमाण आपल्या चवीनुसार कमी-जास्त करू शकता.

  • उपवासासाठी बनवत असाल तर फक्त सैंधव मीठ वापरा.

  • अधिक पौष्टिक बनवण्यासाठी भोपळ्याच्या बिया किंवा अक्रोडही घालू शकता.

आजचे राशिभविष्य, ११ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

रोज मूठभर भोपळ्याच्या बिया खा; हृदयापासून पचनापर्यंत होतील महत्त्वाचे फायदे

Ganesh Chaturthi 2026 : यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पासाठी ट्राय करा 'हे' स्पेशल मोदक; जाणून घ्या रेसिपी

रुपाली भोसलेचा मराठमोळा अंदाज; 'साज शृंगार' म्हणत शेअर केले खास फोटो

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल